बाळासाहेब ठाकरेंचा ‘हा’ व्हिडीओ शेअर करत कंगणाने पुन्हा साधला शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाच संकट अजून टळलं नसतानाच सध्या राज्यात अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असा वाद पेटला आहे. कंगणा सोशल मीडियावर एकामागून एक ट्विट करता शिवसेनेवर टीका करत आहे. यात आता कंगनाने आणखी एक ट्वीट केलं आहे. कंगनाने बाळासाहेब ठाकरे यांचा जुना विडिओ शेअर करून शिवसेनेला राजकीय प्रश्नही विचारायला सुरुवात केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्वीट करत कंगनाने आघाडी करुन शिवसेनेची एक दिवस काँग्रेस होईल असं म्हणल्याचा हा व्हीडीओ आहे. आज शिवसेनेची परिस्थिती पाहून काय वाटत असेल असा सवाल कंगनाने केला आहे.

कंगना मुंबईत पोहोचायच्या आधीच मुंबई महापालिकेने तिच्या ऑफिसवर कारवाई केली. कारवाईस सुरुवात झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पाकिस्तान झाली असल्याचा पुनरुच्चार केला. “मी कधी चुकीची नव्हते आणि माझे शत्रू हे वारंवार सिद्ध करत आहेत की मुंबई आता PoK झाली आहे”, असं ती म्हणाली. सातत्याने बॉलिवूडवर निशाणा साधणाऱ्या कंगनाने आता थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. कंगनाने एकामागोमाग एक असे संतप्त ट्वीट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like