नवी दिल्ली । काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी रिया चक्रवर्ती ही ‘बंगाली ब्राह्मण महिला’ असल्याचं नमूद करत तिला ड्रग्ज प्रकरणात गोवलं गेल्याचा आरोप केलाय. सुशांतला न्याय मिळवून देण्याची व्याख्या, बिहारसाठी न्यायाची व्याख्या असायची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
रियाच्या अटकेचा उल्लेख त्यांनी ‘भयानक घटना’ असा केलाय. ‘रिया चक्रवर्तीनं कुणालाही आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं नव्हतं. तीनं कोणताही आर्थिक अपराध केलेला नाही. तिला एनडीपीएस अर्थात नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सब्स्टन्स अधिनियमानुसार अटक करण्यात आलीय. असं करून आपल्या राजकीय नेत्यांना खूश करण्यासाठी केंद्रीय एजन्सीनं आपली भूमिका निभावलीय. समुद्र मंथनानंतर त्यांनी अमृताऐवजी ड्रग्जचा शोध लावलाय’ असं म्हणत अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय भाजप सरकारवर टीका केलीय.
रिया चक्रवर्ती हिचे पिता सेनेचे माजी अधिकारी राहिल्याचंही अधीर रंजन चौधरी यांनी नमूद केलंय. अनेक वर्ष त्यांनी देशाची सेवा केली परंतु, आपल्या दोन मुलांना मात्र ते न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरत असल्याचंही चौधरी यांनी म्हटलंय. रियाचे पित्यालाही आपल्या मुलांसाठी न्याय मागण्याचा अधिकार आहे. मीडिया ट्रायल आपल्या न्यायिक प्रणालीचा बेकार हिस्सा आहे. सर्वांना न्याय मिळणं हाच आपल्या संविधानाचा मूळ सिद्धांत आहे’ असंही अधीर रंजन चौधरी यांनी सोशल मीडियावर म्हटलं.सुशांतसिंह राजपूत हा भारतीय अभिनेता होता. पण भाजपाने निवडणुकीत फायदा घेण्यासाठी त्याला बिहारी अभिनेता करून टाकले, अशी टीका करत त्यांनी अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.