संतप्त झालेल्या कंगणाने आता थेट सोनिया गांधींना केला ‘हा’ सवाल …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यातच बीएमसीने कंगणाचे मुंबईतील ऑफिस अनधिकृत बांधकाम प्रकरणी तोडल्यापासून कंगना खूप चिडली आहे. याबद्दल ती सतत ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधत असते. यावेळी कंगणाने चक्क कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लक्ष्य केले आहे.

कंगनाने सोनिया गांधी यांना ट्विट करत म्हणले आहे की एक महिला होण्याच्या नात्याने त्यांना या गोष्टीच वाईट वाटत नाही का की कंगना सोबत महाराष्ट्र सरकार अशा प्रकारे वागत आहे. डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेची तत्त्वे पाळण्यास तुम्ही आपल्या पक्षाला सांगू शकत नाही का ?? असे कंगनाने विचारले. कंगनाचे हे ट्विट आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’