शिवसेना सत्तेसाठी सोनिया सेना झालीय – कंगना राणावत

0
34
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केल्यानंतर वाद उफाळून आला. त्यांनतर ९ सप्टेंबर रोजी कंगनाच्या आॅफिसचे अनाधिकृत बांधकाम बीएमसीने पाडले. त्यांनतर सदर वाद चांगलाच पेटला आहे. आता कंगनाने शिवसेना सत्तेसाठी सोनिया सेना झालीय असं ट्विट केले आहे.

ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली होती ती आता सत्तेसाठी सोनिया सेना झालीय. ज्या गुंडांनी माझं घर पाडलं त्यांना सिविक बाॅडी म्हणू नका. संविधानाचा एवढा मोठा अपमान करु नका अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे.

दरम्यान, महापालिकेने केलेल्या पाडकामाच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कंगना रनौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत, ‘आज माझे घर तुटले, उद्या तुमचा अहंकार तुटेल. हा काळाचा महिमा आहे, तो बदलत असतो,’ असे म्हणत बॉलीवूड माफिया आणि उद्धव ठाकरे यांचे गुळपीठ यानिमित्ताने उघड झाल्याचा आरोपही केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here