टीम हॅलो महाराष्ट्र । “दिल्ली पोलिसांनी जी पत्रकार परिषद घेतली ती दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद वाटतच नव्हती, ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पत्रकार परिषद वाटतच होती.” असा घणाघाती आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमारने दिल्ली पोलिसांवर केला.
“ज्या प्रकारे या प्रकरणाला डावं आणि उजवं असा रंग दिला जातोय हे फार चिंताजनक आहे.”असं कन्हैया कुमार म्हणाला. ” कॅम्पसमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला अथवा कोणत्याही पक्षाशी जोडल्या गेलेल्याला मारहाण होणं अत्यंत निंदनीय आहे. कॅम्पसमध्ये कुठल्याही प्रकारे हिंसाचार झाला नाही पाहिजे.” असं परखड मत एका वृत्त वाहिनीशी बोलताना व्यक्त केलं.
दिल्ली पोलिसांनी आज(१० जानेवारी) जेएनयू हिंसाचारप्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती. डीसीपी क्राइम ब्रांच जॉय तिरकी यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत असं म्हटलं की व्हायरल झालेला फोट आणि सीसीटीव्हीच्या मदतीने ही अनेकांची ओळ पटवण्यात पटली. लवकरच या विद्यार्थ्यांना नोटीस पाठवली जाईल असं पोलिसांनी सांगितलं.
जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशी घोष, संघटनेच्या समितीचे सदस्य सुचेता तालुकदार, प्रिया रंजन, डोलन सामंत, योगेंद्र भारद्वाज, विकास पटेल, पंकज मिश्रा आणि वास्कर विजय हे देखील हल्ल्यातील संशयित असल्याचं पोलिसांनी सांगितलं.