हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमदार नितेश राणे यांच्या गायब झाल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांच्याबाबत माहिती देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी आज नोटीस बजावली आहे. दरम्यान मंत्री राणे यांना दुपारी तीन वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले होते, मात्र, ते हजर राहिले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, राणे यांनी काल एक पत्रकार परिषद घेत राज्य सरकावर टीकास्त्र सोडले होते. यावेळी त्यांना नितेश राणे कुठे आहेत?असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला असता त्यावर तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर दिलं होते. आता याबाबतच पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून नितेश राणेंची माहिती घेण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे. नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत.