कांशीराम जयंतीविशेष | सुनिल शेवरे
भारतीय राजकारणाची क्षितिज ही कितीही ऊंच असली तरीही आंबेडकरी जनतेच्या वाटेला अगदी बाबासाहेबांच्या काळात सुद्धा उपेक्षाच आली. तरीही बाबासाहेब व्यवस्थे विरोधात लढले. बाबासाहेबांनी खासदार अगदी मद्रास प्रांतामधुन निवडुन आणले. स्वाभिमान चेतवून जागे करणारे बाबासाहेब आंबेडकर स्वतः कधीही निवड़णुकीत जिंकु शकले नाहीत.
आज चा आंबेडकरी समाज हा शेकडो नेत्यांच्या मागे फिरणारा समाज म्हणून ओळखला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर प्रस्थापित कॉंग्रेस पक्षाने आंबेडकरी नेत्यांना देशी दारू दुकानाचे लायसन्स मिळवून दिले. काहींना पक्षाची उमेद्वारी तर काहिंना खासदार केल.
सन १९५६ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर पक्षात दुफळी माजली. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन विसर्जित करून भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना ३ ऑक्टो. १९५७ ला झाली. सार काही आलबेल सुरु असल्याचं भासवत नेत्यांनी अंतर्गत कुरघोड्या करण्यास सुरुवात केली. यशवंत तथा भैयासाहेब आंबेडकर आणि माइसाहेब आंबेडकर यांच्यात वाद होण्याची जणु नेते वाट पाहत होते. नंतर वेगवेगळे गट पडत गेले. चळवळ विखुरली आणि त्याचाच फायदा कॉंग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणात घेतला. महाराष्ट्रात १९७२ साली संघटने च्या स्वरुपात दलित पँथर ची स्थापना करण्यात आली. त्यात अग्रेसर नामदेव ढसाळ, गंगाधर गाडे, अरूण कांबळे, हिरालाल उर्फ़ भाई सांगारे, राजा ढाले, रामदास आठवले, गंगाधर गाड़े ही मंडळी होती. अन्यायाच्या विरोधात लढणारी आक्रमक संघटना म्हणून पैंथर नावा रूपास आली.
१९७१ ला देशात लोकसभेच्या निवडणुकांचा संग्राम चालु होत होता, रिपब्लिकन पक्षाच्या, कॉंग्रेस च्या बैठका पार पडत होत्या. तड़जोडी ने ५०० पैकी ४९९ जागा कॉंग्रेस ला आणि बाकिच्या सर्व जागा रिपब्लिकन पक्षाला देण्याचे ठरले. बैठकीत रिपब्लिन पक्षाकडुन दादासाहेब गायकवाड़, बी.सी. कांबळे, एन. शिवराज यांसारखे अनेक नेते उपस्थित होते.त्या बैठकीत पंजाब चा युवकाचा समावेश होता. हा व्यवहार काही या युवकाला पटत नव्हता. मग त्याने भारतभर सायकल यात्रा काढून फुले शाहु आंबेडकर घराघरात पोहोचवला. त्याच नाव होतं कांशीराम. हे तेच कांशीराम ज्यांनी भारतीय राजकारणात आपली नवीन ओळख निर्माण केली आणि भाजप आणि कॉंग्रेस ला आव्हान देणाऱ्या बहुजन समाज पक्षाची स्थापना १४ एप्रिल १९८४ ला केली. बाबासाहेब म्हणत असत कॉंग्रेस ला पर्याय देणारा सक्षम पक्षा म्हणुन रिपब्लिकन पक्ष काम करेल. मात्र कांशीराम यांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं ते १९८४ साली. उत्तर प्रदेशातील १९८६ च्या बसपा च्या पहिल्याच निवडणुकीत पक्षाचे ( उत्तर प्रदेश ) दोन आमदार निवडून आणले.
सन १९९५ साल उजाडल उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका येऊन धड़कत होत्या. कॉंग्रेस विरोधात अनेक प्रादेशिक पक्ष एकत्र येत होते. हिच संधी साधुन कांशीराम यांनी राजकारणाचे डावपेच खेळावयास सुरुवात केली. भाजपा सारख्या पक्षाला सुद्धा आपल्या कवेत घेत पहले ‘हम बाद में तुम’ नारा देत ३ में १९९५ रोजी आयएएस ची तयारी करत असलेल्या मुलीची निवड़ केली, तिचं नाव होतं मायावती प्रभु दास. याच मायावती पुढे जाऊन उत्तर प्रदेश च्या ४ वेळा मुख्यमंत्री झाल्या. त्यांना देशातल्या पहिल्या दलित महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला. फ़ोर्ब्स च्या २००९ च्या शक्तिशाली महिलांच्या यादित मायावती यांनी पहिल्या १० मध्ये क्रमांक पटकावला.
कांशीराम यांचा जन्म १५ मार्च १९३४ साली पंजाब च्या रोपड़ जिल्ह्यात खवासपुर गावी एका सामान्य कुटुंबात झाला. कांशीराम आजीवन अविवाहित राहिले. महाराष्ट्रात त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले मात्र अपेक्षित यश मिळाल नाही. ते पुण्यात डी.आर.डी.ओ मध्ये वैज्ञानिक पदावर कार्यरत होते. समग्र भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन टाई वाला बाबा ( बाबासाहेब ),फेटे वाले बाबा ( फुले आणि शाहु ) सांगितला. १९७८ पासूनच नामांतराच्या लढाई ला सुरुवात होत होती. परंतु राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटावा असा नेता चळवळी ला दिसत नव्हता. नेते सुस्त झाले होते. कांशीराम मात्र दिवस रात्र एक करुन आंबेडकरी समाजात जनजागृती करत होते परंतु त्याला विधायक स्वरूप देण्यासाठी १९७८ मध्ये बामसेफ ची स्थापना केली.
कांशीराम शरीराने थकले होते. प्रकृती अस्वास्थामुळे २००२ साली त्यांनी आला उत्तराधिकारी म्हणून मायावतींच्या नावाची घोषणा केली. ३ वर्ष कोमातुन उठु न शकणाऱ्या कांशीराम यांनी दिल्लीत ९ ऑक्टो.२००६ रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आणि १९५६ नंतर पुन्हा एकदा बहुजन समाज पोरका झाला.
आज कांशीराम यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन




