धोनीच्या निवृत्तीबाबत कपील देव म्हणाले …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये आयसीसी वर्ल्ड कपमध्ये अखेरचा सामना खेळला होता. तेव्हापासून धोनीने एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही आहे. तसेच काहीच दिवसांपूर्वी बीसीसीआयने धोनीला वार्षिक करारातून वगळले होते. तेव्हापासून धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीबाबतच्या चर्चेला वेग आला आहे. दरम्यान धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा होत असताना भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि देशाला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार कपील देव यांनी त्याच्या पुनरागमनाबद्दल महत्वाचं विधान केलं आहे.

आपल्या भारतीय संघाला दोन वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देणारा धोनी जर इतक्या मोठ्या काळासाठी क्रिकेटपासून दूर राहिला असेल तर मला वाटत नाही तो पुन्हा क्रिकेट खेळेल, असे कपील देव म्हणाले.

जर तुम्ही इतक्या मोठ्या कालावधीत क्रिकेट खेळला नाही तर मला वाटत नाही तुम्ही पुन्हा खेळू शकेल. धोनीला आयपीएलच्या माध्यमातून पुनरागमनाची एक चांगली संधी आहे. आयपीएलमध्ये तो कशी कामगिरी करतो यावर बरच काही अवलंबून आहे. तेव्हा निवड समितीला देखील हे ठरवावे लागेल की देशासाठी सर्वोत्तम काय आहे, असे कपील म्हणाले. धोनीने देशासाठी मोठ योगदान दिले आहे. पण जेव्हा तुम्ही ६ ते ७ महिने खेळत नाही तेव्हा मनात शंका निर्माण होते असेही कपील यांनी नमूद केले.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेमधून जखमी रोहित शर्मा ‘आउट’ ; ‘या’ खेळाडूला मिळणार संधी

आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत के.एल राहुलने घेतली मोठी झेप

केजरीवाल दहशतवादी असल्याचा आमच्याकडं भक्कम पुरावा- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

Leave a Comment