सीएए विरोधात शाहीनबागमध्ये सुरु असलेलं आंदोलनं योगायोग नाही, एक कारस्थान आहे- पंतप्रधान मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहचला आहे. विकासाच्या मुद्द्यांवरून दिल्लीत सुरु झालेला प्रचार आता सीएएविरोधात आंदोलनांना केंद्रस्थानी ठेवत आरोप-प्रत्यारोपांमध्ये अडकला आहे. दरम्यान आज पंतप्रधान मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात सामील झाले आहेत. सीएएच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाबाबत दिल्लीतील कडकडडुमा येथील प्रचारसभेत त्यांनी मोठं विधान केलं आहे.

सीएएविरोधात जामिया, शाहीन बागमध्ये सुरु असलेली आंदोलने हा योगायोग नाही, तो एक प्रयोग आहे. यामागे राजकारणाचं असं डिझाइन आहे, जे राष्ट्राच्या सौहार्दाला बाधा आणत आहे. केवळ कायद्याला विरोध असता तर सरकारच्या आश्वासनांनंतर तो संपला असता. पण आप आणि काँग्रेसची ही खेळी आहे. हे लोक देशाचे तुकडे तुकडे करण्याचा विचार असणाऱ्या लोकांना वाचवत आहे, अशा शब्दात मोदींनी आप आणि काँग्रेसवर टीका केली.

पंतप्रधान मोदींचा विश्वास: ११ फेब्रुवारीनंतर दिल्लीत भाजपाचं सरकार येईल!
येत्या ११ फेब्रुवारीला दिल्लीत जेव्हा भाजपचं सरकार बनेल तेव्हा या सर्व कॉलनींमध्ये विकासकामे आणखी वेगाने पुढे सरकणार आहेत. दिल्ली भाजपने हाही संकल्प केला आहे की या कॉलनींसाठी डेव्हलपमेंट फंड बनवला जाईल. झोपडीधारकांना पक्की घरं मिळतील,’ असं आश्वासन मोदी यांनी कडकडडुमा येथील प्रचारसभेत दिलं.

मोदी पुढे म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टी जे बोलते ते करते. भाजप नकारात्मकतेत नव्हे तर सकारात्मकतेवर विश्वास ठेवते. देशासाठी केलेले संकल्प आमच्यासाठी मोठे आहेत. देशासमोर जी शेकडो आव्हाने होती, ती सोडवतोय. दिल्लीतही मोठी समस्या होती. अवैध कॉलनींचा प्रश्न कोणीही सोडवला नव्हता. कोर्टात तारखांवर तारखा पडत होत्या. दिल्लीच्या ४० लाखांहून अधिक लोकांना मोठ्या चिंतेतून आमच्या सरकारने मुक्त केलं आहे. तुम्हाला आता सरकारी बुलडोझरच्या चिंतेतून मुक्ती मिळाली आहे.’

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

‘हे गांधी किंवा खानचे सरकार नाही!’ भाजप खासदार परवेश वर्माने पुन्हा एकदा केलं वादग्रस्त विधान

केजरीवाल दहशतवादी असल्याचा आमच्याकडं भक्कम पुरावा- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेमधून जखमी रोहित शर्मा ‘आउट’ ; ‘या’ खेळाडूला मिळणार संधी

Leave a Comment