कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्याही प्रचंड वाढली आहे. मात्र राज्य शासनाच्या योग्य नियोजनामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा आता आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. लॉकडाउनमुळे सर्व उदयपगधंदे बंद असल्याने याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम पडला आहे. यापार्श्वभूमीवर आता काही उद्योगधंद्यांना लॉकडाउनच्या काळात शिथिलता देण्याचा विचार सरकार करत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरिता शासनाने एक खुशखबर दिली असून २० एप्रिल पासून कापूस विक्री सुरु होणार असल्याची घोषणा राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी सदर माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्यात कापूस हे महत्वाचे पीक आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि प. महाराष्ट्राच्या काही भागात कापसाची पेरणी केली जाते. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी कापूस हे वर्षभरातलं महत्वाचे पीक असल्याने अनेकांसाठी कापसावर अर्थकारण अवलंबून आहे. यंदा कापसाचे उत्पादन अतिशय चांगल्या प्रकारे झाले आहे. मात्र कोरोनामुळे कापूस खरेदी थांबली हाती. मात्र आता कापूस विक्री सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
लोकडाउन चा काळ वाढत असताना यातून शेतीपूरक व्याव्व्यावसायांना मुभा देण्याची भूमिका राज्य, केंद्र सरकार घेत आहे. येत्या २० एप्रिलच्या दरम्यान राज्यात कापूस खरेदी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत शासनाने सदर निर्णय घेतला असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. याबाबत त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन आखण्याचा सूचना दिल्या असून लवकरच कापूस विक्री सुरु होणार आहे.
यावेळी ज्या शेतकऱ्याचे कापसाचे पीक आहे अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करायचे आहे. जे शेतकरी अशाप्रकारे ऑनलाईन बुकिंग करून अथवा फोन करून आपल्या कापूस उत्पादनाची माहिती देतील अशा शेतकऱ्यांना प्रशासनाने ठराविक दिवस आणि ठराविक वेळ द्यावयाची आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपला कापूस त्या वेळेत कापूस विक्री केंद्रावर घेऊन जाईचा आहे असेही पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. स्थानिक बाजार समित्यांनी यामध्ये प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचनादेखील पाटील यांनी केल्या आहेत.