कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत पावटा व घेवडा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत शनिवारी दि. 20 रोजी 85 पोती पावट्याची आवक झाली असून 10 किलोचा दर 250 ते 300 रूपये होता तर घेवडा 35 पोती आवक असून 150 ते 200 रूपये 10 किलोचा दर होता. तर शेवगा व हिरवा वाटाणा मार्केटमध्ये आलेला नाही.
कराड येथील स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये (10 किलोचा दर पुढीलप्रमाणे) वागी -100 ते 120 रूपये, टोमॅटो – 200 ते 300 रूपये, भेंडी – 180 ते 200 रूपये, दूधी – 100 ते 150 रूपये, कारले – 120 ते 1500 रूपये, फ्लाॅवर – 130 ते 160 रूपये, कोबी – 50 ते 70 रूपये, आले – 150 ते 180 रूपये, हिरवी मिरची – 100 ते 150 रूपये, पावटा – 250 ते 300 रूपये, गवारी – 200 ते 300 रूपये, घेवडा -150 ते 200 रूपये, ढब्बू मिरची – 200 ते 300 रूपये, काकडी- 100 ते 120 रूपये, पडवळ – 150 ते 200 रूपये, कांदा – 100 ते 250 रूपये, बटाटा – 150 ते 220 रूपये व लसून – 500 ते 700 रूपये असा दर आहे.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीत आज पावटा व घेवडा तेजीत होता. तर कोंथीबीर, मेथी, पालक व शेपू पालेभाज्याही शेतकऱ्यांनी आणलेल्या होत्या. मार्केट कमिटीत पेरूचे 25 कॅरेट आलेले असून 10 किलोचा दर 200 ते 300 असा होता. तर मागील काही दिवसांपासून तेजीत असलेला हिरवा वाटाणा आणि शेवगा आज बाजारात आला नाही.