कराड बाजार समिती सभापतीपदी विजयकुमार कदम तर उपसभापती संभाजी चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । अक्षय पाटील
नुकत्याच पार पडलेल्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंग उंडाळकर यांच्या गटाने दणदणीत विजय मिळवत सत्ता राखली होती. आज कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आणि उपसभापतींची निवड करण्यात आली असून सभापतीपदी विजयकुमार कदम (बाबरमाची) तर उपसभापती पदी संभाजी चव्हाण (वारूंजी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कराड शेती उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली रयत पॅनेलने विजय मिळवत आपली सत्ता कायम राखली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे प्रदेश सदस्य अतुल भोसले यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला. आज निबंधक संदीप जाधव यांच्या उपस्थितीत निवडी पार पडल्या. यावेळी सभापतीपदी विजयकुमार कदम तर उपसभापती पदी संभाजी चव्हाण यांची निवड करण्यात आली.

या निवडीवेळी रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, वसंतराव जगदाळे, माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, संचालक प्रकाश पाटील, नितीन ढापरे यांच्यासह नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. कराड बाजार समितीची निवडणूक यंदा चांगलीच गाजली होती. अखेर काँग्रेसच्या कै. स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या रयत पॅनलने 12-6 असा दणदणीत विजय मिळवत आपली सत्ता कायम राखली.