कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहराला कोरोना विषाणुने पुन्हा एकदा विळखा घातला आहे. आज आलेल्या रिपोर्टनुसार कराड शहरात ३ नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कराड शहरातील पायर्याखालील भागात एक तर बूधवार पेठऔंधकर हाॅस्पिटल परिसर व रणजित टाॅवर येथिल असे तीन जण बाधित आढळल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे ३९ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ४ जणांनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तसेच जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 66 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
39 जणांचा अहवाल कोविड बाधित
कराड तालुक्यातील किवळ येथील 5, मलकापुर, वहागाव, पाचवड, निगडी, चाळकेवाडी व कराड येथील 1, व खोडशी येथील 2, फलटण तालुक्यातील फलटण येथील 5, विंचुर्णी येथील 12, मलटण, भाडळी बु., वाखरी, कोळखी, सासवड, मिरडे येथील प्रत्येकी 1, व खंडाळा तालुक्यातील खंडाळायेथील 2, शिरवळ येथील 1 असे एकुण 39 जण कोविड बाधित असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले आहे.
यामध्ये कराड तालुक्यातील किवळ येथील 36,69,31 वर्षीय पुरुष, 32,56 वर्षीय महिला, मलकापुर येथील 36 वर्षीय पुरुष, खांडशी येथील 62 वर्षीय महिला व 32वर्षीय महिला, वहागाव येथील 44 वर्षीय महिला, पाचवड येथील 56 वर्षीय पुरुष, निगडी येथील 46 वर्षीय महिला, चाळकेवाडी येथील 51 वर्षीय पुरुष, तर कराड येथील 62 वर्षीय पुरुष.
फलटण तालुक्यातील विंचुर्णी येथील 40, 40, 70,45,22 वर्षीय महिला व 19, 17, 19 वर्षीय तरुण व 10 वर्षाचा मुलगा , 13 वर्षाचा मुलगा व 20,21 वर्षीय तरुण, रावडी खु. येथील 34 वर्षीय पुरुष, सगुणामाता नगर येथील 70 वर्षीय पुरुष, भाडळी येथील 38 वर्षीय पुरुष, वाखरी येथील 46 वर्षीय पुरुष, फलटण येथील 43 व 55, 60 वर्षीय पुरुष, कोळकी येथील 58 वर्षीय पुरुष, मलटण येथील 27 वर्षीय पुरुष, सासवड येथील 25 वर्षीय महिला, मिरडे येथील 45 वर्षीय पुरुष
खंडाळा तालुक्यातील खंडाळा येथील 23व 47 वर्षीय पुरुष, अहिरे येथील 37 वर्षीय पुरुष.
4 रुग्णांचा मृत्यू
संचेती हॉस्पिटल वाई येथे पसरणी ता. वाई येथील 87 वर्षीय पुरुष व जावळे ता. खंडाळा येथील 60 वर्षीय पुरुष दोन कोविड बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणीत कोविड बाधित आलेला विखले ता. खटाव येथील 77 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच जिल्हा रुग्णालय सातरा येथे कोरेगांव येथील 75 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.