कर्नाटकमधील विजयाने काँग्रेसमध्ये नवचैनत्य!! कराड शहरात जोरदार जल्लोष

karad congress
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत एकहाती सत्ता काबीज केली आहे. कर्नाटकातील या विजयामुळे संपूर्ण देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या या ऐतिहासिक विजयाचे पडसाद पाहायला मिळाले. साताऱ्यातील कराड तालुक्यात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्याची आतिषबाजी व घोषणाबाजी विजयाचा जल्लोष करण्यात आला. कराड उत्तरचे अध्यक्ष निवास थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोष करण्यात आला.

यावेळी फटाक्याची आतिषबाजी करत काँग्रेसचे राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जयघोष करीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी निवास थोरात यांनी म्हंटल की, आज पर्यंत भाजपने मोठ्या चुका केल्या. वाढती महागाई तसेच लोकांच्या मनामध्ये जाती धर्माविषयी तेढ निर्माण करून गैरसमज निर्माण करण्याचे काम केले आहे. भाजपाच्या या चुकीच्या वागणुकीची प्रत्येकाने जाण ठेवून येत्या 2024 च्या निवडणुकीत भाजपचे पानिपत करून काँग्रेसला विजयी करावे.

या वेळी कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, कराड दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिग्विजय पाटील, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष झाकिर पठाण, प्रदीप जाधव, अशोकराव युवक काँग्रेसचे पदाधिकारी अमोल नलावडे, सुहास थोरात, देवदास माने, गणेश सातारकर, आमीर कटापुरे, योगेश लादे, गणेश गायकवाड, राहुलराज पवार, अनिल माळी, शरद पाटील, विजय पाटील, मुबिन बागवान, शाहरुख मुल्ला, शरीफ मुल्ला, नईम पठाण, श्रीतेज लादे, अजीम मुजावर, मुकुंद पाटील, संग्राम काळभोर, किरण पांढरपट्टे, ओमकार बनसोडे आदी या वेळी उपस्थित होते..