हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात नऊ शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. यातील जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. दरम्यान, कराड शेती उत्पन्न बाजार समितीतून आज अखेर 15 जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. तर आजच्या एका दिवसात 13 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता 18 जागांसाठी अद्याप 59 जण निवडणूक रिंगणात आहेत. उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने अंतिम चित्र दुपारी तीन नंतर स्पष्ट होणार आहे.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आज अर्ज माघारी घेतल्यांची नावे
1) सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघ : उद्धव राजाराम जाधव, राहुल अमृतराव पवार, महेश प्रल्हाद काटकर, 2) महिला राखीव गटातून : शहाबाई खाशाबा शिंदे, 3) इतर मागास प्रवर्गातून : मारुती पांडुरंग माळी, अर्जुन जनार्दन कुंभार, संपत लक्ष्मण कुंभार, 4) विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून : काशिनाथ विठ्ठल कारंडे, 5) ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून : अभिजीत दिनकर मोरे, तुकाराम निवृत्ती डुबल, प्रतापसिंह आनंदराव पाटील व 6) अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून : तानाजी शंकर थोरात, दिनकर मोरे, तुकाराम निवृत्ती डुबल, प्रतापसिंह आनंदराव पाटील, 7) अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून : तानाजी शंकर थोरात यांनी आवळे उमेदवारी अर्ज काढून घेतले.
काल मंगळवारी महिला राखीव मतदारसंघातून सुरेखा सुरेश देसाई यांनी तर सोमवारी 1 उमेदवाराने अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे छाननीतून पात्र 73 अर्जापैकी 15 जणांनी आजपर्यंत माघार घेतली आहे. आता उद्या गुरूवारी दि. 20 रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने कोण अर्ज ठेवणार व कोण काढणार हे उद्या दुपारी 3 वाजता चित्र स्पष्ट होणार आहे.