कराड नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणात पुन्हा देशात अव्वल : सलग चाैथ्या वर्षी बहुमान

Karad Nagerpalika
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड नगरपरिषदेने पुन्हा एकदा देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. सलग चाैथ्या वर्षी नगरपरिषदेने बहुमाम मिळवला आहे. यावर्षीही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशातील शेकडो नगर परिषदांमध्ये कराड नगरपरिषदेने बाजी मारली आहे. याबाबतचे पत्र सोशल मिडियावर फिरत असून यामध्ये कराड नगरपरिषदेला दुसरा क्रमांक मिळाला असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.

या पत्रात, एक ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा बक्षीस वितरण देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते पार पडणार असल्याचे म्हटले आहे. 2018 साली सुरू झालेला हा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील कराड नगरपरिषदे कायम अव्वल राहिली आहे. देशातील सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदा गटात कराड नगर परिषदेने सातत्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, अभियंता ए. आर. पवार, पालिकेचे वरिष्ठ मुकादम मारुती काटरे, तत्कालिन नगराध्यक्षा, सर्व नगरसेवक तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावल्याने देशात कराड नगरपरिषद अग्रक्रमाने स्पर्धेत अव्वल राहिली आहे.

एक आक्टोंबरला राष्ट्रपतीच्या हस्ते गाैरव
दिल्ली येथे 29 व 30 सप्टेंबर रोजी देशातील अव्वल ठरलेल्या नगरपरिषदांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत केलेल्या कलाकृती तसेच राबवलेले उपक्रमावर आधारित प्रदर्शनाचे हे आयोजन केले असून कराड नगरपालिका ही या प्रदर्शनात भाग घेणार आहे. दोन दिवसाच्या प्रदर्शनानंतर एक आक्टोंबर रोजी पारितोषिक वितरण राष्ट्रपतीच्या हस्ते होणार आहे.