कराड नगरपालिकेकडून स्थलांतरित लोकांची अवहेलना, गैरसोयी असताना पूरग्रस्तांना शाळेतून बाहेर काढले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्याला गेल्या काही दिवसात पावसाने झोडपले आहे. जिल्ह्यात पडत मुसळधार पावसाचा तडाखा कराड शहरालाही बसलेला आहे. कराड शहरातील पाटण काॅलनीत झोपडपट्टीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या भागातील लोकांना काही दिवस नगरपालिकेने नगरपालिकेच्या शाळेत स्थलांतरीत केले होते. परंतु झोपडपट्टीतील लोकांना स्थलांतरीत ठिकाणावरून गैरसोयी असताना पुन्हा झोपडपट्टीत पाठवले आहे. नगरपालिकेने या लोकांची अवहेलना सुरू केली असून कोणीही झोपडपट्टीतील लोकांची चाैकशी करत नसल्याचा आरोप तेथील लोकांनी केला आहे.

मुसळधार पावसाने शहरातील पाटण कॉलनीतील झोपडपट्टी मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे तेथील लोकांचे स्थलांतर नगरपालिका शाळेत करण्यात आले होते. सध्या पाटण कॉलनीमध्ये अनेक झोपडपट्ट्यांमध्ये चिखल, गाळ तसेच कचरा साचलेला आहे. अद्याप या ठिकाणावरील स्वच्छता करण्यात आलेली नाही. झोपडपट्टीमध्ये पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. अशा परिस्थितीत नगरपालिकेने स्थलांतरित केलेल्या लोकांना नगरपालिकेच्या शाळेतून बाहेर पुन्हा झोपडपट्टीमध्ये जाण्यास सांगितले आहे.

पाटण काॅलनीतील झोपडपट्टीतील गैरसोयी असल्याने व नगरपालिकेने जबाबदार झटकल्याने रहिवाश्यांच्यतून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच अधिकारी किंवा राजकीय व्यक्ती कोणीही या भागात फिरकले नाही. झोपडपट्टीतील भागातील पंचनामाही अद्याप केला नाही. नगरपालिकेने आम्हांला झोपडपट्टीच्या जागेवर घरे बांधून द्यावीत, तसेच सध्या पंचनामे लवकरात लवकर करण्याची मागणी रहिवाशी नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment