एक दोन नव्हे 50 फोन : कराड नगरपालिकेत ए. आर. पवार म्हणजे “कोण रं भाऊ”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड नगरपालिकेत मेहेरबानांचे राज्य असताना अनेकदा टक्केवारून आरोप- प्रत्यारोप झालेले पहायला मिळातात. कामाचा दर्जाबाबत वारंवार चर्चा होत असतात. मात्र आता प्रशासक आल्यानंतर अधिकाऱ्यांची मुजोरी वाढलेली दिसून येत आहे. चक्क मुख्याधिकाऱ्यांनी यांनी कामाबाबत केलेले जवळपास एक दोन नव्हे चक्क 50 फोन उचलले जात नाहीत. तेव्हा ए. आर. पवार म्हणजे “कोण रं भाऊ” असे म्हणण्याची वेळ आता कराडकरांसह मुख्याधिकाऱ्यांवर आलेली आहे.

कराड शहरातील रूक्मिणी नगर परिसरात एका ठिकाणी चेंबरचे बांधकाम करण्यात आले. कराड नगरपालिकच्या ठेकेदाराने काही तासातच हे काम उरकून घेतले आहे. या कामावर पाणी मारणे, त्यांचा दर्जा यांचा काहीही संबध दिसून आला नाही. ठेकेदाराने आपले काम दर्जात्मक न करता उरकते घेतले. तरी नगरपालिकेचे अधिकारी झोपेत असल्याचे दिसून आले. याबाबत नागरिकांनी विचारणा करण्यासाठी ए. आर. पवार यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो उचलला नाही, तेव्हा मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या कानावर हा विषय संबधितांनी घातला. मुख्याधिकाऱ्यांनी ए. आर. पवार यांना जवळपास 50 फोन केले. परंतु ते उचलले नसल्याचे खुद्द मुख्याधिकारी यांनी संबधितांना सांगितले.

ठेकेदारांची कमाल ! तीन तासांत चेंबर बांधून तयार 

शनिवारी दि. 28 मे रोजी काल दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान नगरपालिकेचे एक ठेकेदाराने रूक्मिणी नगर येथे एका चेंबरचे काम केले. बरेच दिवस चेंबरचे काम झाले नव्हते. रस्ता तयार झाल्यानंतर चेंबरसाठी रस्ता उकरला. केवळ 3 तासात 5 ते साडेपाच फूटाचे चेंबर तयार केला. बांधकामांच्या दृष्टीने पूर्णपणे चुकीच्या पध्दतीने हे काम झाले आहे. केवळ 4 तासात पैसे लुटण्याचे काम ठेकेदारांकडून सुरू आहे आणि तेथे कोणताही नगरपालिकेचा अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे.

याबाबत नगरपालिकेचे अधिकारी ए. आर. पवार यांना फोन केला, व्हाॅटसअपला फोटो पाठवले परंतु रविवारी सायंकाळ पर्यंत त्याबाबत कोणताही रिप्लाय किंवा प्रतिसाद नाही. त्यानंतर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनाही शनिवारीच यांची कल्पना दिली. परंतु कालपासून मुख्याधिकारी यांनी 50 पेक्षा अधिक फोन ए. आर. पवार यांना केले. तरी फोन उचलले नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकारी मुख्याधिकाऱ्यांचा ऐकत नाही. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तक्रार अर्जाद्वारे करणार असल्याचे सातारा जिल्हा काॅंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी सांगितले.

Leave a Comment