कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील म्हासोलीतील बाधिताच्या सहवासातील 60 व 33 वर्षीय तसेच मलकापूरातील 9 वर्षाची मुलगी आणि गुजरातमधून आलेल्या कोरेगाव तालुक्यातील चंचळी येथील 29 वर्षीय युवकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. सोमवारी सकाळी जिल्ह्यातून चार रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने कोरोना मुक्त झालेल्या रुग्णाची संख्या 66 इतकी झाली होती. हा दिलासा मिळत असतानाच सायंकाळी आणखी 4 जणांचे अहवाल बाधित आले आहेत.
कराड तालुक्यातील म्हासोलीतील पुणे येथून प्रवास करून आलेल्या बाधिताच्या सानिध्यात आलेल्या 60 व 33 वर्षीय तसेच मलकूपरामधील 9 वर्षाच्या मुलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना तपासणीसाठी प्रशासनाने ताब्यात घेतले आहे.
कराड तालुक्यातील रुग्ण संख्या 94 झाली आहे यापैकी, कृष्णा हॉस्पिटल कराड येथून 30, उपजिल्हा रुग्णालय कराड येथून 4 तर सह्याद्री हॉस्पिटल कराड येथून 21 रुग्ण असे एकूण 55 रुग्ण आजपर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 133 झाली असून या पैकी कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 66 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.