कराड प्रतिनिधी | सकलेण मुलाणी
आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थक गटाच्या येरवळे येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. कराड दक्षिणमध्ये विविध गावातील अनेक गट काँग्रेसला राम राम करत भाजपात प्रवेश करत असल्याने, आमदार पृथ्वीराज चव्हाण गटात खळबळ माजली आहे.
सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणार्या भारतीय जनता पार्टीला देशातील जनतेने विक्रमी बहुमत दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी विविध धोरणे आखून, त्यांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे.
भाजपा सरकारची ही विकासाभिमुख दृष्टी पाहून विरोधी पक्षातील अनेकजण भाजपात जाहीर प्रवेश करत आहेत. कराड दक्षिणमध्येही आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर गटाचे अनेक कार्यकर्ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याने या दोन्ही गटात खळबळ माजली आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण गटाचे येरवळे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संदीप मारूती यादव, ग्रामपंचायत सदस्य वसंत विठ्ठल यादव, माजी सदस्य सुभाष पानस्कर, हनुमान दूध डेअरीचे माजी चेअरमन आनंदराव यादव, सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन बाबुराव यशवंत यादव, गणेश कृष्णत यादव, अधिक लोकरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ना. डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.
यावेळी बोलताना ना. डॉ. भोसले म्हणाले, की गेल्या साडेचार वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेत राज्याचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन सादर केलेला अर्थसंकल्प शेतकर्यांना दिशा देणारा आहे. सरकारच्या अनेक धोरणांमुळे गावोगावी विकासकामांसाठी मोठा निधी प्राप्त होत असून, येत्या काळात येरवळे गावच्या विकासासाठीही राज्य शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी मिळवून देण्याची ग्वाही डॉ. भोसले यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी मोफत मिळवण्याकरता आजच आमचा Whatsapp Group जॉईन करा