वारूंजीत एका बालकासह मावशीचा गळा चिरून खून : आरोपी फरार

0
87
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील वारूंजी येथे घरामध्ये दोन वर्षाच्या बालकाचा व तिच्या मावशीचा गळा चिरून खून करण्यात आला. खूनाची घटना 3 ते 4 दिवसापूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आलेली आहे. पोलिसांना दोन्हीही मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.

घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील वारूंजी फाटा येथील सत्यजित पतसंस्थेच्या पाठीमागील बाजूस ही घटना घडलेली असून याबाबतची माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार माहितीनुसार सदर घटनेतील संशयित आरोपी लक्ष्मी कॉलनी (वारूंजी) येथे भाडेतत्वावर रहात आहेत. संबंधित महिलेचे नाव सुशिला शिंदे (वय- 35, मूळ रा. चाफळ, सध्या. विमानतळ) व मुलाचे नाव विराज गायकवाड (वय- 2) आहे. तर पोलिसांकडून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्याचे काम केले जात आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/282075083257094

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील दाखल झाले आहेत. याबाबतची सखोल माहिती व मृत्यूच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here