हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।सातारा लोकसभा निवडणुकीसाठी (Satara Lok Sabha 2024) महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथे भव्य सभा (Narendra Modi Speech in Karad) आयोजित करण्यात आली आहे. उद्या २९ एप्रिल रोजी दुपारी १ च्या सुमारास सैदापूर परिसरात मोदींची सभा होणार असून या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कराड शहराच्या वाहतूक व्यवस्थेत (Traffic In Karad) मोठा बदल करण्यात आला आहे. तसेच काही महत्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार कोणकोणते रस्ते बंद राहतील आणि पर्यायी मार्ग कोणते असतील हे आपण जाणून घेऊयात….
वाहतुकीकरीता बंद करण्यात येणारे मार्ग
१. दिनांक २९/०४/२०२४ रोजी सकाळी ०६.०० वा पासुन मोदींची सभा संपेपर्यत सैदापुर कॅनॉल ते ओगलेवाडी रोड गणपती मंदिर हा रोड वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहील. या मार्गावर रस्त्याचे दोन्ही बाजुला कोणतेही वाहन पार्क करता येणार नाहीत.
२. सुरली घाट विटा मार्गे, तसेच शामगाव घाट मार्गे कराडकडे कोणत्याही प्रकारचे जड वाहन, बस यांना करवडी फाटा-ओगलेवाडी-सैदापुर कॅनॉल हा रोड वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहील.
३. सैदापुर कॅनॉल-कृष्णा सर्कल-विजय दिवस चौक-भेदा चौक-पोपटभाई पेट्रोल पंप-कोल्हापुर नाका-ढेबेवाडी फाटा-कृष्णा हॉस्पिटल या मार्गावर कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही.
४. कृष्णा हॉस्पिटल-ढेबेवाडी फाटा – खरेदी विक्री पेट्रोलपंप – कोल्हापुर नाका युटर्न-कोयनामोरी-म. गांधी पुतळा- पोपटभाई पेट्रोलपंप-भेदा चौक- विजय दिवस चौक-कृष्णा सर्कल-सैदापुर कॅनॉल या मार्गावर कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही.
५. चिपळूण-पाटण-ढेबेवाडी-उंडाळे-तासगाव- इस्लामपुर या बाजुकडुन येणारी व विटा, आँध-पुसेसावळी बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कराड शहरात प्रवेश न करता हायवे वरुन तासवडे – शिरवडे- मसुर- शामगाव घाट मार्गे विटा औंध-पुसेसावळी बाजुकडे जातील.
६. अत्यावश्यक वैदयकीय सेवा (अॅम्ब्युलन्स साठी) सैदापुर कॅनॉल-गणपती मंदिर- ओगलेवाडी रोड हा मार्ग बंद राहील त्याऐवजी सैदापुर कॅनॉल-बनवडी फाटा-गजानन हौसिंग सोसायटी-गणपती मंदिर- ओगलेवाडी चौक- करवडी फाटा या मार्गाचा वापर करावा.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग
१. विटा सुरली घाट मार्गे, तसेच शामगाव घाट मार्गे कराडमध्ये येणारी एसटी, जड वाहने ही मसुर-उंब्रज- तासवडे टोल नाका- हायवे ने कोल्हापुर नाका मार्गे कराड मध्ये येतील.
२. ओगलेवाडी-रेल्वे स्टेशन कडील वाहने ही ओगलेवाडी चौक- एमएसईबी बनवडी बनवडी फाटा-कोपर्डे- सहयाद्री साखर कारखाना-शहापुर फाटा-शिरवडे-तासवडे वहागाव मार्गे हायवे ने कोल्हापुर नाका मार्ग कराड मध्ये येतील.
पार्किंग ठिकाणे
व्हीव्हीआयपी सभेकरीता येणारे वाहनांची पार्किंग व्यवस्था
चारचाकी वाहने
१. सातारा बाजुकडुन येणारी चारचाकी वाहने ही उंब्रज-मसुर-सहयाद्री साखर कारखाना-कोपर्ड बनवडी फाटा-वेणुताई चव्हाण कॉलेज-शासकीय इंजिनिअरींग कॉलेज या ठिकाणी पार्क करावीत.
२. सांगली जिल्हयातुन विटा-कडेगाव मार्गे व सातारा जिल्हयातुन औंध-पुसेसावळी यामार्गे येणारी चारचाकी व दुचाकी वाहने करवडी फाटा-ओगलेवाडी मार्गे गजानन हौसिंग सोसायटी येथील सुर्या . फर्निचर पासुन पुर्वेस असणा-या अमर जाधव यांचे (शेतात) मैदानावर पार्क करतील.
३. चिपळुण, पाटण, ढेबेवाडी, उंडाळे बाजुकडुन सभेकरीता येणारी चारचाकी वाहने ही कोल्हापुर नाका युटर्न – कोयनामोरी-म. गांधी पुतळा-पोपटभाई पेट्रोलपंप-भेदा चौक्-विजय दिवस चौक्-कृष्णा सर्कल- सैदापुर कॅनॉल – एसजीएम कॉलेज पाठीमागे हॉलीफॅमिली येथील पैसा फंड व लिगाडे पाटील कॉलेज येथील मैदानात पार्क करावीत.
दुचाकी वाहने
१. इस्लामपुर, तासगाव, उंडाळे, ढेबेवाडी पाटण या भागातुन सभेकरीता येणारी दुचाकी वाहने ही कोल्हापुर नाका यूटर्न-कोयनामोरी-म. गांधी पुतळा-पोपटभाई पेट्रोलपंप-भेदा चौक्-विजय दिवस चौकू- कृष्णा सर्कल सैदापुर कॅनॉल येथील पार्किंग ठिकाणी पार्क करावीत.
२. सातारा-उंब्रज बाजुकडुन येणारी दुचाकी वाहने फार्मसी कॉलेज विदयानगर येथे पार्क करावीत.