वेणूताई चव्हाण रुग्णालय कोविड उपचारासाठी खुलं होणार – राजेश टोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी 
कराडचे वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात कोविडसाठी उपचारासाठी लवकरच सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कराड येथील कृष्णा रूग्णालयात राष्ट्रवादी पक्षाचे कराड उत्तर मतदार संघाचे आमदार व राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर कोविड पॉझिटीव्ह आल्याने उपचार सुरू आहेत. त्याच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी राजेश टोपे आले होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखरसिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदिप वाकडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील व हॉस्पिटलचे वैद्यकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राजेश टोपे म्हणाले, उपजिल्हा रूग्णालयातील काही भाग कोविड उपचारासाठी वापरात आणला जाणार आहे. येथे व्हेंटीलिटरचा प्राब्लेम होता, त्याविषयी डायरेक्टर अर्चना पाटील यांना सुचविलेले आहे. सातारा जिल्ह्याला सर्वात जास्त व्हेंटीलिटरचा पुरवठा करण्यात यावा.

तसेच इतर जिल्ह्यातून आणि केंद्राकडून येणारे व्हेंटीलिटरही सातारा जिल्ह्यात पुरवावेत अशी सूचना टोपे यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यात आयसीयुचा तुटवडा नाही, त्यामुळे उपजिल्हा रूग्णालयाचा काही भाग कोविड उपचारासाठी सुरू केला जाईल. यासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्यासोबत चर्चा केली असून तात्काळ यावर अंमलबजावणी केली जाईल असं टोपे पुढे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment