कराडला अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकीसह दोघे ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | नारायणवाडी, ता. कराड व शहर हद्दीत असे दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध मदय वाहतुक करणाऱ्या दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून ताब्यात घेतले. त्यांच्या सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुबारक दादापिर मकानदार (वय- 32, रा. शनिवार पेठ, ता. कराड), सोमनाथ बबन गायकवाड (वय- 38, रा. खोडशी, ता. कराड) अशी अवैध दारू वाहतुकप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्कच्या आदेशान्वये हातभट्टी दारू, ताडी व अवैध मद्य चोरटी वाहतूक व विक्री यावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नारायणवाडी, ता. कराड व कराड शहर हद्दीतून अवैध मद्य वाहतूक केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या कराड विभागाच्या पथकाला मिळाली. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने नारायणवाडी व कराड शहरात सापळा लावून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या मुबारक मकानदार व सोमनाथ गायकवाड या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी दारूचे 8 बॉक्स क दोन चारचाकी गाड़ी असा 2 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरचे उपआयुक्त वाय. एम. पवार यांचे आदेशान्वये व सातारा अधीक्षक अनिल चासकर यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एस. साळवे, दुय्यम निरीक्षक आर. एस. खंडागळे, जवान विनोद बनसोडे, भिमराव माळी, एस. बी. जाधव यांनी केली.

Leave a Comment