आता कुठल्याही परिस्थितीत कर्नाटकात पुन्हा लॉकडाउन नाही- मुख्यमंत्री येडियुरप्पा

0
43
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बेंगळुरू । ”आता आता कुठल्याही परिस्थितीत, कर्नाटकात पुन्हा लॉकडाउन करणार नाही” असं राज्याचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा सरकारच्या वर्षपुर्तीच्यावेळी बोलताना सांगितलं. ”कोरोना व्हायरसमुळे आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही, पण आता काहीही झाले तरी कर्नाटकात पुन्हा लॉकडाउन करणार नाही. अर्थसंकल्पात मी ज्या काही घोषणा केल्या आहेत, त्या भविष्यात पूर्ण करेन. गरज पडली, तर कर्ज काढून सर्व प्रकल्प पूर्ण करेन” असे येडियुरप्पा म्हणाले.

“कर्नाटकाच्या विकास योजनांना कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. अजून बरेच काही करायचे आहे. स्थिर सरकार देण्यासाठी मी कटिबद्ध आहे” असे येडियुरप्पा म्हणाले. सोशल डिस्टन्सिंग पाळून बंगळुरुमधील विधान सौध येथे सरकारची वर्षपुर्ती साजरी करण्यासाठी व्हर्च्युअल सेलिब्रेशनची व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान, रविवारी कर्नाटकात ५,१९९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. ८२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य खात्याने ही माहिती दिली. कर्नाटकात ९६ हजार १४१ जणांना करोनाची लागण झाली. त्यात ५८,४१७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ३५ हजार ८३८ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे कर्नाटकात आतापर्यंत १,८७८ जणांचा बळी गेला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here