हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Karnataka Bank : वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी RBI कडून रेपो दरात दोन वेळा 90 बेस पॉईंटची वाढ केली गेली. ज्यामुळे आता रेपो दर 4.9 टक्क्यांवर आला आहे. याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर होतो आहे. अशातच बँकांकडून कर्जाचे EMI ही वाढवण्यात आले आहेत. मात्र एक चांगली गोष्ट अशी कि, बनाकनी एफडीवरील व्याजदरही वाढवले आहेत. यामध्येच आता कर्नाटक बँकेचाही समावेश झाला आहे.
Karnataka Bank कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्स असलेल्या एफडीवरील व्याजात 10 बेस पॉइंट्स किंवा 0.10% वाढ केली आहे 1 जुलैपासून हे नवीन व्याजदर लागू होतील. बँकेकडून देशांतर्गत FD आणि NRE रुपी टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे.
असे असतील नवीन व्याजदर ???
या व्याजदर वाढीनंतर आता 1-2 वर्षांच्या एफडीवर 5.35% आणि 2 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर 5.50% व्याज मिळेल. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना 1-5 वर्षांच्या घरगुती एफडीवर 0.40% आणि 5-10 वर्षांच्या एफडीवर 0.50% जास्त व्याज दिले जाईल. हे लक्षात घ्या कि, Karnataka Bank कडून ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर दिले जाणारे अतिरिक्त व्याज आता बंद करण्यात आले आहे. तसेच बँक आता 2 कोटींपेक्षा कमीच्या FD मध्ये मुदतपूर्व पैसे काढण्यावर कोणताही दंड आकारणार नाही.
विविध कालावधीच्या एफडीवरील व्याजदर
Karnataka Bank कडून 7 ते 45 दिवसांच्या FD वर 3.40%, 46 ते 90 दिवसांच्या FD वर 4.90%, 91 दिवस ते 364 दिवसांच्या FD वर 5.00%, 1 ते 2 वर्षांच्या FD वर 5.25%, 2 वर्ष ते 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.40%, 5 ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.50% व्याज दिले जाईल. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांना 1-2 वर्षांच्या एफडीवर 5.65%, 2-5 वर्षांच्या एफडीवर 5.80%आणि 5-10 वर्षांच्या एफडीवर 6% व्याज दिले जाईल.
NRE रुपी टर्म डिपॉझिट्स
येथे 1-2 वर्षांच्या FD वर 5.35% तर 2 ते 5 वर्षांच्या एफडीवर 5.50% आणि 5 ते 10 वर्षांच्या एफडीवर 5.50% व्याज दिले जाईल.
बचत खात्यावरील व्याज
Karnataka Bank कडून 50 लाखांपर्यंत बॅलन्स असलेल्या बचत खात्यावर 2.75% तर 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतच्या बॅलन्स असलेल्या बचत खात्यावर 3.50% आणि 1 कोटी रुपयांवरील बॅलन्स असलेल्या बचत खात्यावर 4.50% व्याज दिला जाईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://karnatakabank.com/personal/term-deposits/fixed-deposit
हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजात पुन्हा केली वाढ, नवीन दर तपासा
Ration Card आधारशी लिंक करण्याची आज शेवटची संधी, लिंक करण्याची प्रक्रिया तपासा
Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन दर पहा
UPI ट्रान्सझॅक्शन मध्ये झाली वाढ, त्याद्वारे पैसे कसे पाठवायचे ते पहा