Karnataka Election Results 2023 : काँग्रेस- भाजपमध्ये ‘काटे की टक्कर’; जलद अपडेटसाठी Dailyhunt पहा

Karnataka Election Results 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण भारतातील एक महत्त्वपूर्ण राज्य मानलं जाणाऱ्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य आहे. 10 मे ला कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून मतदारांनी आपलं मत कोणाच्या पारड्यात टाकलं याची उत्सुकता लागली आहे. कर्नाटकात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक हे एकमेव राज्य आहे ज्याठिकाणी भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आपला हा गड आणखी मजबूत करण्यासाठी भाजपने यंदा जोरदार प्रचार केलाय. तर दुसरीकडे कर्नाटकात भाजपला खिंडार पाडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. कर्नाटकात भाजप आणि काँग्रेसमध्ये ही चुरस असतानाच जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत असू शकतो.

कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेच्या 224 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले आहे. तर 13 मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या एकूण 224 जागांसाठी तब्बल 2,613 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये 2,427 पुरुष, 184 महिला आणि 2 इतर उमेदवारांचा समावेश आहे. पक्षीय उमेदवारांची संख्या बघितली तर त्यामध्ये भाजपचे 224, काँग्रेसचे 223 (मेलूकोटमध्ये सर्वोदय कर्नाटक पक्षाला पाठिंबा), जेडीएसचे 207, आपचे 209, बसपचे 133, सीपीआय (एम) कडून 4, JD(U) कडून 8 आणि NPP कडून 2 उमेदवार रिंगणात पाहायला मिळाले तर 685 उमेदवार हे नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्षांचे असून 918 अपक्ष आहेत.

यंदाच्या निवडणुकीत 5,31,33,054 अधिकृत नोंदणी मतदार असून, त्यातील 16 लाख नवे मतदार आहेत, त्यांना या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करण्याची संधी मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे कर्नाटकमधील या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने 80 वर्षांवरील लोकांसाठी आणि अपंगांसाठी घरून मतदान (VFH) ही सुविधा सुरू केलीये.

डेलीहंट कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे लाईव्ह कव्हरेज देत आहे. निवडणुका केवळ आकड्यांवर नसतात, असे आमचे मत आहे. प्रत्येक नागरिकाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या निकाला पर्यंत पोहोचण्यासाठी डेटा, नमुने आणि विश्लेषणाचा अर्थ लावण्यावर आमचे लक्ष आहे. आम्ही सर्व कानाकोपऱ्यातून विश्लेषण करू आणि डेटा आणि त्याचा अर्थ काय आहे याचा सखोल अभ्यास आपल्यापुढे सादर करू. या निवडणूक निकालाचे विश्लेषण अशा प्रकारे सादर केले जाईल की ते सर्वसामान्य व्यक्तींपासून ते राजकीय तज्ञापर्यंत सर्वजण अत्यंत सोप्या पद्धतीने समजू शकेल. डेलीहंटच्या कव्हरेज मध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल.

1) एका चांगल्या मांडणीच्या स्वरूपात निकालांचे लाइव्ह अपडेट
2) सध्याच्या निवडणुकीतील आकडेवारी आणि त्याची मागील निकालांशी तुलना
3) राज्यवार आणि मतदारसंघनिहाय जागांच्या निकालाचे अपडेट
4) सोशल मीडियावरील प्रतिक्रिया तसेच ट्विटरवरील ट्रेंडिंग स्टोरीज
5) याशिवाय थेट व्हिडिओ, व्हायरल मिम्स, ट्रेंडिंग स्टोरीज, व्हिडिओ असा सर्वसमावेशक गोष्टी डेलिहंटच्या कव्हरेज मधून मिळतील.

Stay tuned with Dailyhunt