हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच आहे, असे निकाल देताना न्यायालयाने सांगितले आहे.

यावेळी हिजाबबाबत निकाल देताना न्यायालयाने म्हंटले आहे कि, शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा अधिकार आहे. तेच निर्णय घेतील. हिजाब हा गणवेशाचा भाग नसून तो शाळेचा व संस्थांचा भाग नाही. हिजाब घालणे मुस्लिम धर्मात अनिवार्य नाही. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच आहे, असे न्यायालयाने म्हंटले आहे.

हिजाब बंदीबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका या आज पार पडलेल्या सुनावणीवेळी फेटाळून लावलया. उडुपी जिल्ह्यातील याचिकाकर्त्या मुलींनी हिजाब बंदीच्या निर्णयावर आक्षेप घेत कर्नाटक उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. हिजाब प्रकरणाची मंगळवारी सुनावणी पार पडली . याचवेळी न्यायालयाने निकालाच्या दृष्टीने दोन्ही बाजूचे अंतिम युक्तिवाद ऐकला. या प्रकरणात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित आणि न्यायमूर्ती जे. एम. काझी यांच्या पूर्ण खंडपीठाची स्थापना करण्यात आली होती. या पूर्ण खंडपीठाने आज हिजाबबाबत महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

Leave a Comment