हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज कार्तिकी एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा संपन्न झाली. यावर्षी औरंगाबादच्या साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्याबरोबर शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला. विशेष म्हणजे आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही महापूजेचा मान मिळवणारे फडणवीस हे पहिले नेते ठरले आहेत.
पहाटे २ वाजून २० मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांचे श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आगमन झाले. यांनतर आधी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. औरंगाबादच्या माधवराव साळुंखे ( वय, ५८ ) आणि कलावती माधवराव साळुंखे ( वय, ५५ ) या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांबरोबर पूजा करण्याचा बहुमान मिळाला.
LIVE | Media interaction in #Pandharpur #एकादशी #Ekadashi #कार्तिकीएकादशी #KartikiEkadashi #Maharashtra https://t.co/KiZsm4h5AX
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 3, 2022
दरम्यान, विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मला मिळाला हे माझं भाग्य आहे. ही पुजा मनाला शांती देणारी आहे. पांडुरंग हा सामान्य माणसाचा देव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे, आणि कष्टकऱ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस यावेत, त्यांच जीवन सुजलाम सुफलाम व्हावं, यासाठी काम करण्याची शक्ती आम्हाला मिळावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही नेहमीच विठ्ठलाला करत असतो असे फडणवीस म्हणाले.