हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा अशी लढत शंभर टक्के होणार आहे अशी माहिती शिवशक्ती पक्षाच्या नेत्या करुणा शर्मा यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे बीडकरांना 2024 साली नवरा विरुद्ध बायको अशी लढत पहायला मिळणार आहे. करुणा शर्मा या आता कोल्हापूर पोटनिवडणूक लढवत आहेत.
करुणा शर्मा म्हणाल्या की, येत्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा ही निवडणूक शंभर टक्के होणार. काँग्रेसला जर बिनविरोध निवडणूक करायची असेल तर त्यांनी मला पाठिंबा द्यावा. माझ्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा कोणी आवाज उठवला नाही. आता पुन्हा एकदा संधी आहे, लोकांनी मला साथ द्यावी. आता कोल्हापुरातून निवडून आले तरीसुद्धा मी बीडमध्ये निवडणूक लढवणारच आहे असेही त्यांनी म्हंटल
निवडणुकीला मी उभे राहावे अशी सर्वांची इच्छा आहे. आज इतके पक्ष आहेत आणि १३ कोटी जनता आहे. आज इतका भ्रष्टाचार सुरु असून, कोणीही आवाज उठवत नाही. मी आवाज उठवला असून, निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे. २०२४ मध्ये तर नवरा विरुद्ध बायको लढत होणार असल्याचे नक्की आहे. संपूर्ण जगात याची चर्चा होणार आहे. धनजंय मुंडे विरुद्ध करुणा मुंडे अशी लढत होणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.