करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी; बीड जिल्हा कारागृहात होणार रवानगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.

करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना आज न्यायालयात दाखल केलं. कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून आरोपी अरुण मोरे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काल करुणा शर्मा यांनी मंदिर परिसरामध्ये महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. म्हणून शर्मासह मोरे यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाहनात पिस्तुल सापडल्याच्या आधारावर गाडी चालक दिलीप पंडित अंदेरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिरासमोर जमा झालेल्या जमावावर कोरोना निर्बंधासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment