काशी बनतेय पर्यटनाचे केंद्र; वार्षिक उलाढाल गेली 20,000 कोटींच्याही पुढे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात ऐतिहासिक वारश्याप्रमाणेच सांस्कृतिक वारसा देखील आहे. त्यामुळे देशभरात पर्यटनासाठी अनेक विविध ठिकाण आहेत. जिथे देश – विदेशातून लोक येतात. त्यामधील एक ठिकाण म्हणजे काशी. काशी म्हंटल की, सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभे ठाकतात ते बाबा विश्वनाथ. प्रत्येक भारतीयांचे स्वप्न असते की एकदा तरी काशीला जाऊन येणे. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या अधिक आहे. या गर्दीमुळे काशी पर्यटनाचे केंद्र बनले आहे. या तीर्थक्षेत्राची वार्षिक उलाढाल ही 20,000 कोटींच्याही पुढे गेली आहे.

दोन वर्षात 13 कोटीच्या पुढे गेली पर्यटकांची संख्या

काशिमध्ये गेल्या दोन वर्षात अनेक बदल झाले आहेत. ज्यामुळे याचा परिणाम हा बनारसच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. काशी विश्वनाथ मध्ये कॉरिडॉर सुरु होऊन दोन वर्षे झाली आहेत. ज्यामुळे गेल्या दोन वर्षात काशीच्या पर्यटकांची संख्या ही तब्बल 13 कोटीच्या पुढे गेली आहे. काशिमध्ये झालेल्या बदलामुळे बनारसच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा झाला आहे. तसेच विमानतळापासून रेल्वे आणि रोडवेपर्यंत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. त्यामुळेही पर्यटक येथे आकर्षित होत आहेत. काशी विश्वनाथ धामने सरकारच्या महसुलात 65 टक्क्यांची जोरदार वाढ केली आहे. मागील वर्षीचा महसूल पहिला तर तो 250 कोटी रुपये एवढा होता. जो या वर्षी 300 ते 350 कोटी रुपयापर्यंत वाढला जाईल. असे सांगण्यात येत आहे.

लोकांना मिळतोय रोजगार

काशीच्या अर्थव्यवस्थेत झालेल्या वाढीमुळे काशिमध्ये इतर सुविधाही वाढणार आहेत. तसेच लोकांनाही रोजगार मिळत आहे. ज्यामध्ये कारागीर, हॉटेल क्षेत्र, लाकूडकाम, पर्यटन यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे. तसेच बनारासची सर्वात प्रसिद्ध असलेली बनारस साडीलाही तेवढीच मागणी येत आहे.

या वर्षी पर्यटकांची संख्या होणार 5 कोटी

काशी मध्ये झालेल्या सुविधेमुळे प्रवाश्यांची संख्या ही वाढताना दिसून येत आहे. ज्यामध्ये 2022 साली ही पर्यटकांची संख्या 4.5 कोटी एवढी होती. जी या वर्षी ही संख्या 5 कोटी एवढी होऊ शकते. ज्यामुळे काशी हे पर्यटनाचे केंद्र बनले आहे. पर्यटकांची संख्या ही एवढी प्रचंड वाढली आहे की ज्यामुळे बनारसमध्ये तब्बल 1000 हॉटेल्स बुक करण्यात आले आहेत.

वर्षाला मिळतोय तब्बल 8 ते 10 हजार कोटी रुपयांचा वाटा

काशी विश्वनाथ हे पर्यटनाचे केंद्र बनले आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे येथे मागच्या दोन वर्षांपासून पायाभूत सुविधांना जोर दिला जात आहे. मागच्या नऊ वर्षात पर्यटकांची संख्या ही दहा पटीने वाढली आहे. ज्यामुळे महसूलात वाढ झाली आहे. फक्त कॉरिडॉरमध्ये येणाऱ्या पर्यटकांमुळे अर्थव्यवस्थेला वर्षाला तब्बल 8 ते 10 हजार कोटी रुपयांचा वाटा मिळत आहे. तसेच पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे रोजगारामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. ज्यामध्ये मोठ्या व्याप्याऱ्यापासून ते छोट्या व्यापाराना याचा फायदा होत आहे. ज्यामध्ये बनारसी कापड व्यापारी, हॉटेलमालक, बोटीचालक, पांडे-पुजारी, ट्रॅव्हल एजंट, ई-रिक्षा, ऑटो आणि टॅक्सी चालक, पूजा साहित्य विक्रेते, पथारी विक्रेते, छोटे व्यापारी यांच्याही उत्पन्नात वाढ झाली आहे.