MS Dhoni : धोनीच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट; चेन्नईच्या CEO नी सांगूनच टाकलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2024 मधून चेन्नई सुपर किंग्सचा संघ बाहेर गेल्यानंतर महेंद्रसिंघ धोनीचा (MS Dhoni) आयपीएल प्रवास संपला कि काय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला आहे. पुढच्या आयपीएल मध्ये धोनीची बॅटिंग पाहायला मिळेल का? मैदानावर धोनी दिसेल का? या विचारांनी चाहते चिंतेत आहेत. धोनीने सुद्धा आपल्या आगामी करिअरबाबत किंवा निवृत्तीबाबत ठोस असा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र त्याच दरम्यान,. चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन (Kasi Vishwanathan) यांनी धोनीच्या करिअरबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.

,महेंद्रसिग धोनी २०२५ चाय आयपीएल मध्ये खेळेल कि नाही हा निर्णय धोनीच घेऊ शकतो. आम्ही नेहमी त्याच्या निर्णयाचा आदर करतो. मला आशा आहे की तो लवकरच निर्णय घेईल. मात्र, तो पुढील वर्षी चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळेल अशी आम्हाला खूप आशा आहे, आणि ही चाहत्यांची आणि माझीही इच्छा आहे, असं काशी विश्वनाथन म्हणाले. धोनीने घेतलेल्या निर्णयांचा आम्ही नेहमीच आदर केला आहे, आपणा सर्वांना माहिती आहे की, धोनी स्वतःचे निर्णय स्वतःच घेतो आणि धोनीने योग्य वेळी ते जाहीर सुद्धा केले आहेत . परंतु आम्हाला खूप आशा आहे की तो पुढील वर्षी CSK साठी उपलब्ध असेल.

दरम्यान, 18 मे रोजी आरसीबी विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पराभव होताच चेन्नई सुपर किंग्सचा संघ स्पर्धेबाहेर गेला. यानंतर धोनी पुन्हा एकदा खेळताना दिसावा अशी इच्छा त्याच्या चाहत्यांची असेल. धोनीनं अंतिम निर्णयासाठी वेळ मागून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धोनीने चेपॉकवर शेवटचा सामना खेळण्याचे वचन संघाला दिले होते ते तो पाळेल अशी आशा व्यवस्थापनाला आहे. महत्वाची बाब म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीचा खेळ चांगलाच राहिला आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात सुद्धा त्याने जवळपास 200 च्या स्ट्राइक-रेटने 25 धावा केल्या होत्या तसेच त्याने ४ ओव्हर फलंदाजी केली होती. क्रिझमधून धावत असताना सुद्धा त्याला कोणताही त्रास झाला नाही, अगदी आरामात तो सिंगल- डबल धावा पूर्ण करत होता. धोनी कुठेही दमलेला दिसला नाही तसेच त्याच्यात कोणतीही अस्वस्थता पाहायला मिळाली नाही. उलट स्टेडियमच्या बाहेर चेंडू घालवत आपण आजही मोठमोठे शकतो हे धोनीने दाखवून दिले हा त्याचा प्लस पॉईंट आहे.