Kawasaki Z900 : Kawasaki ने लॉन्च केली नवी Bike; पहा किंमत आणि फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानी सुपर (Kawasaki Z900) बाईक निर्माता कंपनी कावासाकीने आपली नवी बाईक Z900 बाइक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. नवीन 2023 कावासाकी Z900 हे BS6 मॉडेल आहे, जे भारतात 8.93 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करण्यात आले आहे. भारतीय बाजारपेठेत या बाईकची थेट टक्कर ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल, डुकाटी मॉन्स्टर आणि BMW F900R सारख्या गाड्यांशी होईल. आज आपल्या बाईक रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या गाडीचे दमदार फीचर्स…

फीचर्स- (Kawasaki Z900)

या गाडीच्या (Kawasaki Z900) वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर Z900 ट्रॅक्शन कंट्रोलसह येतो. बाईकची खासियत अशी आहे की मागील टायरचा ट्रैक्शन कमी झाल्याचे लक्षात आल्यावर ते पॉवर डिलिव्हरी कमी करते. यामध्ये लो पॉवर आणि हाय पॉवर असे दोन पॉवर मोड आहेत. याशिवाय स्पोर्ट, रोड, रेन आणि रायडर असे चार राइडिंग मोड आहेत. रायडर मोडमध्ये चालक त्याच्या आवडीनुसार मोटरसायकल सेट करू शकतो. कावासाकीची नवीन बाईक पूर्वीप्रमाणे LED लाइटिंग, नवीन स्टाइलिंग आणि 4.3-इंच कलर TFT डॅशसह येते.

Kawasaki Z900

इंजिन

गाडीच्या इंजिन (Kawasaki Z900) बाबत बोलायचं झाल्यास, कावासाकीच्या Z900 ला तेच 948 cc, इनलाइन 4-सिलेंडर लिक्विड-कूल्ड BS-VI इंजिन मिळते. हे 9,500 rpm वर 123.6 bhp आणि 7,700 rpm वर 98.6 Nm पीक टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्स आणि साइड-स्लंग एक्झॉस्ट डिझाइनशी जोडलेले आहे.

Kawasaki Z900

या बाईकला 43 मिमी अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक एब्जॉर्बर आहे. ब्रेकिंगसाठी, समोरच्या बाजूला ड्युअल 330mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस एक सिंगल 220mm डिस्क ब्रेक उपलब्ध आहेत. Kawasaki Z900 बाईक सध्या बाजारात असलेल्या Ducati Monster, BMW F 900 R सारख्या बाईकला टक्कर देईल.

हे पण वाचा : 

Dlite RX-100 : Dlite ने सादर केली नवी इलेक्ट्रिक स्कुटर; एका चार्जवर 70 किमी धावणार

HOP OXO Electric Bike : 150 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Audi Q3 2022 : भारतात लॉन्च झाली ऑडी Q3; 7.3 सेकंदात 100 किमीचा वेग पकडते

Ducati Streetfighter V2: 955cc च्या इंजिनसह Ducati ने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुती सुझुकीची Alto K10 येणार CNG मध्ये; देईल इतके मायलेज