KBC लवकर माफी मागा; नाहीतर शो ची एक पण ‘Lifeline’ राहणार नाही – नितेश राणे

0
53
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

KBC मधील प्रश्नामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख…

मुंबई प्रतिनिधी । सोनी टीव्ही वर सुरु असलेल्या ‘कौन बनेंगा करोडपती’ (केबीसी) या शो दरम्यान विचारण्यात येणाऱ्या  प्रश्नामध्ये ”मुघल सम्राट औरंगजेबाच्या  समकालीन खालीलपैकी कोणता राज्यकर्ता होता…?” असा प्रश्न केबीसीच्या प्रश्न पटलावर आला तेव्हा त्यात दिलेल्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराज यांचा नुसता ‘शिवाजी’ म्हणून उल्लेख यामध्ये केला असल्याने या शो वर सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

राज्यभरातून याबाबत अनेक लोक व्यक्त होत असतांना दिसत आहेत. ज्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य व औरंगजेबाच्या जुलमी राजवटीच्या विरोधात घालवले, अशा महान राजाचा उल्लेख एकेरी व ज्याने जुलूम व अत्याचार करत जनतेला वेठीस धरले त्याचा उल्लेख ”मुघल सम्राट” करण्यात आल्यामुळे या शो वर सध्या प्रचंड टीका होत आहे.

‘आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करुन ‘केबीसी’ने अपमान केला आहे; लवकर माफी मागा नाही तर शो ची एक पण लाइफलाईन राहणार नाही.” अशी जोरदार टीकाआमदार नितेश राणे यांनी या प्रकरणांवर केली आहे. त्याचप्रमाणे राजकीय, चित्रपट उद्योग क्षेत्रातून यावरटीका होताना दिसत आहे. अभिनेता सुबोध भावे यांने ”छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणावं” तर चित्रपट निर्माते रवी जाधव यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे अत्यंत आदराने लिहावे आणि बोलावे. एकेरी उल्लेख करू नको रे सोन्या… असे ट्विट केले आहे.

 

https://platform.twitter.com/widgets.js

https://platform.twitter.com/widgets.js

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here