केदार जाधव झाला भावूक ; म्हणाला धोनीसोबत खेळायला मिळालं हा माझा सन्मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महेंद्रसिंग धोनीने काल अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेऊन सर्वांनाच धक्का दिला. धोनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर देशभरातुन धोनीसाठी आभार आणि शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली असली तरीही धोनी आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे.धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली रैना,जडेजा, अश्विन, शमी असे अनेक खेळाडू घडवले. त्यातीलच अजून 1 नाव म्हणजे महाराष्ट्राचा खेळाडू केदार जाधव.

धोनीने निवृत्ती स्विकारल्यानंतर केदार जाधवही भावूक झाला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट लिहीत त्याने धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. “तुझ्यासोबत जेवढा वेळ घालवला त्यामधून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्यासारख्या अनेक खेळाडूंना तुझ्यामुळे प्रेरणा मिळाली आहे. तुझ्यासारखा मोठा भाऊ, मार्गदर्शक लाभणं हे मी माझं भाग्य समजतो. तुझ्यासोबत खेळायला मिळणं हा माझा सन्मान आहे”, अशा शब्दांत केदारने धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CD8fHBfFg0l/?utm_source=ig_web_copy_link

धोनीने केदार जाधवचा वापरही अत्यंत खुबीने केलेला आपण बघितल आहे. अनेक वेळा अचानक मिडल ऑर्डर मध्ये गोलंदाजी ला येऊन केदार विकेट घेऊन गेला आहे. तसेच लोवर ऑर्डर मध्ये फलंदाजी करताना धोनी आणि केदार ने अनेकदा मोठी भागीदारी सुध्दा केली होती.