ITR फॉर्म भरताना ज्येष्ठ नागरिकांनी हे नियम लक्षात घ्यावेत; लाखो रुपयांची होईल बचत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| इन्कम टॅक्स रिटर्नचा (ITR) फॉर्म भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. त्यामुळेच या फॉर्म बाबत ज्येष्ठ आणि सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी आखून दिलेले महत्त्वाचे नियम समजून घेणे, आवश्यक आहेत. हे नियम समजले तर ज्येष्ठ नागरिकांची लाखो रुपयांची बचत होऊ शकते. लक्षात घ्या की, आयकर विभाग ज्येष्ठ नागरिकांना कर विवरणपत्र भरण्यासाठी एक विशेष प्राप्तिकर रिटर्न (ITR) फॉर्म प्रदान करते. ज्यामध्ये ते कर सूट मिळवू शकतात. हा फॉर्म ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्पन्नाच्या श्रेणीनुसार आयटीआर फॉर्म भरावा लागतो. आर्थिक वर्षात 50 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले पेन्शनधारक कर भरण्यासाठी ITR 1 वापरू शकतात. परंतु मालमत्ता, इतर स्रोत किंवा भांडवली नफा यातून उत्पन्न असणाऱ्यांनी ITR-2 चा पर्याय निवडला पाहिजे. व्यवसायातून कमावणाऱ्या पेन्शनधारकांनी ITR-3 किंवा ITR-4 फॉर्म भरावा.

कर मर्यादा – महत्वाचे म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांना 3 लाख रुपयांची मूलभूत मर्यादा आहे. तर अति ज्येष्ठ नागरिकांसाठी मर्यादा 5 लाख रुपये आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत समाविष्ट असलेल्यांसाठी देखील मूळ मर्यादा 3 लाख रुपये आहे.

फॉर्म 16 – ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनच्या स्वरूपात उत्पन्न मिळत असेल तर त्यानंफॉर्म 16 भरण्याचा अधिकार आहे. फॉर्म 16 मध्ये त्यांच्या पगाराचे घटक समाविष्ट आहेत. यात त्यांच्या टीडीएसचीही माहिती असते. ज्येष्ठ नागरिक फॉर्म 26AS मध्ये सर्व माहिती असते.

फॉर्म 15H – जेव्हा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने मिळवलेले व्याज एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांच्या लागू मर्यादेपेक्षा जास्त असते तेव्हा बँका TDS कापतात. परंतु ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या बँकांना त्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असल्यास TDS कापून न घेण्याची विनंती करू शकतात. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बँकांमध्ये फॉर्म 15H भरावा लागतो.