Share Market मधून फायदा मिळवण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल Share Market मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या अनेक लोकं शेअर मार्केटमध्ये रस घेत आहेत. अशातच फास्ट इंटरनेट, ऑनलाइन वेबसाईट्स आणि डीमॅट खात्यांमुळे तर ट्रेडिंग करणे आणखी सोपे बनले आहे. मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरु करण्याआधी त्याच्याशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टींची माहिती करून घ्यायला हवी. अन्यथा याद्वारे फायद्या ऐवजी मोठे नुकसानच सहन करावे लागू शकेल.

कंपनीची माहिती जाणून घ्या

गुंतवणुकीचा हा पहिला आणि मूलभूत नियम आहे, जो प्रत्येक गुंतवणूकदाराने पाळायलाच हवा. गुंतवणूक करताना आपल्यातील प्रत्येकालाच कोणत्याही कंपनीची पूर्ण माहिती कळेलच असे नाही. मात्र किमान कंपनीच्या व्यवसायाबाबत तरी मूलभूत माहिती घ्यायला हवी.

स्टॉप-लॉसकडे दुर्लक्ष करणे

हा एक असा महत्वाचा फॅक्टर आहे. जो गुतंवणूकदाराला शेअर बाजारातील मोठ्या नुकसानीपासून वाचवतो. यामुळे गुतंवणूकदारांना जोखीम कमी करून बाजारातून योग्य वेळी बाहेर पडता येते. शॉर्ट टर्म ट्रेडींगमध्ये स्टॉप लॉसची गरज आणखी वाढते कारण यामध्ये जास्त जोखीम असते. Share Market

Market Today Live: Indices rally for sixth consecutive session, Sensex and Nifty end at new highs

ओव्हरट्रेडिंग करणे

वारंवार ट्रेडिंग केल्याने हाय व्हॅल्यू खर्च आणि टॅक्स लागू शकतो, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे उत्पन्न कमी होऊ शकते. त्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणुक करून ओव्हरट्रेडिंग टाळणे महत्त्वाचे ठरेल.

पोर्टफोलिओमध्ये विविधता

अनेक गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक तर विविधता आणत नाहीत किंवा जरा जास्तच वैविध्य आणतात. मात्र आपल्या पोर्टफोलिओमध्ये संतुलन राखणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. Share Market

How Does the Stock Market Work? | Chase

कोणतेही ध्येय न ठेवता गुंतवणूक करणे

गुंतवणूकदारांकडून केली जाणारी सर्वात मोठी चूक म्हणजे कोणत्याही ध्येयाशिवाय गुंतवणूक करणे. आपल्या गुंतवणुकीची उद्दिष्टे, जोखीम समजून न घेता बाजारात गुंतवणूक करणे ही मोठी घोडचूक ठरेल. Share Market

इतरांच्या पोर्टफोलिओकडे पाहून गुंतवणूक करणे

अनेक गुंतवणूकदार इतरांच्या पोर्टफोलिओकडे पाहून गुंतवणूक करतात. असे करणे चुकीचे नाही मात्र आंधळेपणाने इतरांचे अनुसरण करणे धोकादायक ठरेल. कारण प्रत्येक गुंतवणूकदाराचे वेगवेगळे फॅक्टर आणि प्लॅनिंग असतात.

भावनिक होऊन गुंतवणुक करणे

भावनांच्या अधीन गुंतवणुक करणे सर्वात वाईट आहे. कारण याचा परिणाम आपल्या निर्णय प्रक्रियेवर होतो. जर आपण एखादा शेअर खरेदी केला मात्र त्याची किंमत घसरू लागली तर पोझिशन हेज करणे महत्वाचे असते. अशा वेळी कंपनीची कामगिरी न पाहता भावनिक होऊन निर्णय घेणे अंगलट येऊ शकेल.

नवीन गुंतवणूकदारांनी इंट्राडे ट्रेडिंग टाळावे

कोणत्याही नवीन गुंतवणूकदाराने इंट्राडे ट्रेडिंग करणे टाळायला हवे. कारण इथेच जास्त नुकसान होते. कारण शेअर बाजाराचा दीर्घ अनुभव आणि माहिती नसल्याने नुकसान होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे कधीही इंट्राडे ट्रेडिंग करू नये. Share Market

Best performing stocks for half-year 2021 - Nairametrics

नुकसानीची भीती न बाळगता त्यातून धडा घ्या

प्रत्येक गुंतवणूकदारासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकांमधून शिकणे आणि त्या टाळणे. प्रत्येकजण गुंतवणूकदार कधी ना कधी चुकीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवत असतो. ही काही फार मोठी गोष्ट नाही. हा देखील आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भागच आहे. जर आपणही कधी चुकीचे शेअर्स घेतले असतील आणि तोटा झाला असेल तर तोट्याला न घाबरता त्यातून बाहेर पडा. Share Market

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/

हे पण वाचा :
Bank Loan : तुम्ही सुद्धा कर्जामुळं बेजार झालाय का? ‘हे’ 5 अधिकार जाणुन घ्या अन् निवांत रहा..
NMACC : 5 Star Hotel पेक्षा काही कमी नाही निता अंबानींची ‘ही’ वास्तू; प्रवेश फी केवळ Rs.199
Donald Trump यांनी पोर्नस्टारला पैसे दिले? नक्की काय आहे Hush Money प्रकरण
Smartphone च्या स्पीकरमध्ये साचली आहे घाण, ‘या’ 3 Tricks वापरून करा साफ
ICICI Mutual Fund : ‘या’ 10 स्किम बाबत जाणुन घ्याल तर व्हाल मालामाल; पैसे 3-4 पटीने वाढवून मिळण्याची हमी..