हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या युगात मोबाईल (Mobile) ही एक जीवनावश्यक वस्तू झाली आहे. मोबाईल जवळ नसेल अनेकांना करमत सुद्धा नाही. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वच जण मोबाईलचा वापर करतात. मोबाईलचा वापर झाल्यांनतर आपण लगेच तो खिशात ठेऊन देतो. पण असे केल्याने होणारे तोटे कदाचित तुम्हाला माहीत नसतील. मोबाईल चुकीच्या खिशात ठेवल्यास तुम्हाला नपुंसकता सुद्धा येऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही फोन खिशात ठेवता तेव्हा तुमच्या शरीरावर 2 ते 7 पट जास्त रेडिएशन होतात. हे रेडिएशन तुमच्या डीएनएची रचना बदलू शकते. तसेच या रेडिएशन मुळे नपुंसकत्वाचा धोका संभवतो आणि हृदयाशी संबंधित समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात. जेव्हा तुम्ही तुमचा फोन तुमच्या पॅन्टच्या खिशात ठेवता, तेव्हा रेडिएशन तुमच्या पेल्विक हाडांना कमकुवत करू शकते.
आता तुम्हांला प्रश्न पडला असेल की मग आपला मोबाईल नेमका ठेवायचा तरी कुठे ? तर तुम्ही तुमचा मोबाईल पर्समध्ये किंवा बॅगमध्ये ठेवल्यास उत्तम होईल, पण जर तुम्ही ते करू शकत नसाल तर पाठीमागील खिशात ठेवा. परंतु येथेही फोन ठेवताना हे लक्षात ठेवा की त्याची मागील बाजू वर राहिली पाहिजे जेणेकरून तुमचे शरीर त्याच्या किमान रेडिएशनच्या संपर्कात येईल.