विंग ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या निवडीवरून खडाजंगी : आनंदराव खबाले अध्यक्ष तर विकास होगले उपाध्यक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील विंग गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी दोन अर्ज दाखल झाल्याने निवडीवरून ग्रामसभेत खडाजंगी झाली. मात्र तडजोडीने जयवंत पाटील यांनी माघार घेतल्याने आनंदराव खबाले यांच्या नावांवर अखेर अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. तसेच गावात 24 बाय 7 मीटरला नळजोडणी नसल्याचे निदर्शनास आल्यास संबधित ग्राहकाचे नळ कनेक्शन बंद करण्याचा ठराव सुर्वानुमते ग्रामसभेत घेण्यात आला.

विंग येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निर्बंध शिथील झाल्याने तब्बल दोन वर्षानी सरपंच शुभांगीताई खबाले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. गावात 24 बाय 7 घरगुती नळकनेक्शन मीटर जोडली आहेत. मात्र मीटरपुढे नळजोडणी केलेली नाही. प्लबिंग नाही. त्यामुळे पाणीचोरी होत असल्याचे  ग्रामपंचायतीचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे. दरमहा 50 हजार रूपये अर्थिक फटका बसत आहे. त्या मुद्यावरून पाणीचोरी करणाऱ्या तसेच नळ कनेक्शन न जोडणाऱ्या ग्राहकाचे नळ कनेक्शन बंद करावे, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. जिल्हा क्रिडाधिकारी यांच्या परवानगीने येथील गायरान जागेत बहुउदेशीय क्रीडांगण प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. उपसरपंच सचिन पाचुपते यांनी मुद्दा उपस्थित केला.

तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी दोन अर्ज दाखल झाल्याने निवडीवरून पेच निर्माण झाला. यावेळी जोरदार खडाजंगी झाली. तडजोडीने जयवंत पाटील यांनी माघार घेतल्याने आनंदराव खबाले यांच्या नावावर शिकामोर्तब झाले. तर उपाध्यक्ष म्हणून विकास होगले यांची निवड झाली. निवडीनंतर नवनिर्वाचित श्री. खबाले व श्री. होगले यांचा सत्कार यावेळी झाला. सभेस शंकरराव खबाले, प्राध्यापक हेंमत पाटील, बाबुराव खबाले, संजय खबाले, कृष्णेचे संचालक बबनराव शिंदे, शंकर ढोणे, रमेश खबाले, राजेंद्र खबाले, संपत खबाले यांनी चर्चेत सहभाग घेतला. ग्रामपंचायत सदस्या दिपाली पाटील, अश्विनी माने, प्रियांका कणसे, साधना कणसे, पुनम डाळे, संतोष कासार-पाटील, ग्रामविकास अधिकारी किसन रोंगटे यांनी प्रास्ताविकात प्रोसिंडीग वाचन केले.

Leave a Comment