खडसेंसह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू – पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड । खडसेंसह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू, असा विश्वास कराड येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यावर रोष दाखवला. त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही. त्यांच्याबद्दल छळवाद झाला, असा त्यांनी आरोप केला. त्यांनी पक्षांतर केले आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीतील प्रवेशासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे पहिल्यांदाच आपल्या मूळगावी कोथळी गावी गेले होते. यावेळी ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंचं औक्षण करून त्यांचं घरी स्वागत केलं होतं. रक्षा खडसे या नाथाभाऊंच्या स्नुषा असल्या तरी त्या भाजपच्या खासदार आहेत. पक्ष बदलल्यानंतर खडसे गावी परतल्यानंतर त्यांचं रक्षा खडसे यांनी स्वागत केल्याने राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

देवेंद्र फडणवीसांनी मला त्रास दिला
राष्ट्रवादीत प्रवेशकर्ते झाल्यानंतर एकनाथ खडसेंनीही भाजपवर तोफ डागली आहे. भारतीय जनता पक्षात माझ्यावर मोठा अन्याय सुरु होता. तिथल्या काही प्रवृत्तींनी जाणून बुजून मला टार्गेट केलं. सगळ्यात जास्त देवेंद्र फडणवीसांनी मला त्रास दिला, ही माझी भावना आहे. मला खेदाने सांगावंस वाटतं की मी आणखीही भाजपमध्ये असतो तर माझी अवस्था वाजपेयी-अडवाणींसारखी झाली असती”, असं खडसे म्हणाले. वाजपेयी-अडवाणी एवढे ज्येष्ठ नेते असून देखील त्यांची पक्षात अशी अवस्था झाली तर मग आपलं काय होणार होतं? हा सगळा एकंदरीत विचार करूनच मी पक्षांतराचा निर्णय घेतला. मी यानिमित्ताने शरद पवारांचे आभार मानतो की त्यांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्यांनी जर प्रवेश दिला नसता तर माझे राजकीय जीवन थांबले असते, अशी भावनाही खडसेंनी व्यक्त केली आहे. (prithviraj chavan on eknath khadse ncp entry)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in