Khalapur Landslide: बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात खालापूरच्या इर्शाळवाडीवर दरड कोसळण्याची दुर्घटना (Khalapur Landslide) घडली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत ३४ जणांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम बचाव कार्य पथकाने केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘जोपर्यंत गावातील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत दुर्घटनाग्रस्तांना शिधा पुरवला जाईल’ अशी घोषणा भुजबळ यांनी केली आहे.
मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार-
छगन भुजबळ यांनी दुर्घटनेची दखल घेत सर्व घटनेचा आढावा घेतला आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. आता अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार आहे. तसेच ५ लिटर रॉकेल, १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर या सर्व गोष्टी मोफत नागरीकांना पुरविल्या जाणार आहेत.
आतापर्यंत ९७ लोकांची ओळख पटली – (Khalapur Landslide)
दुर्घटनास्थळावरील परिस्थिती (Khalapur Landslide) जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अन्न, नागरी पुरवठा विभाग तेथील नागरिकांना मदत पुरवणार आहे. दरड कोसळल्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत होऊन बसले आहे. तसेच अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. इर्शाळवाडी येथे वेगाने बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत ९७ लोकांची ओळख पटली आहे. या दुर्घटनेमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत.
इर्शाळवाडीत घडलेले ही दुर्घटना (Khalapur Landslide) मनाला चटका लावणारी आहे. या घटनेची राज्यातील अनेक मंत्र्यांनी दखल घेतली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घटनास्थळी जाऊन सर्व स्थितीचा आढावा घेतला आहे. या दुर्घटनेत जवळपास २५ ते ३० घरे निघाल्याखाली गेली आहेत. गेल्या तीन दिवसात गावात ४९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या घटनेनंतर आता गावातील इतर नागरिकांना सुरक्षा स्थळी हलविण्यात आले आहे.
दरड कोसळल्यामुळे गावचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे गावातील स्थिती पूर्ववत होयला बराच वेळ जाणार आहे. तोपर्यंत प्रशासनाकडून गावाला सर्व आवश्यक मदत पुरवली जाणार आहे. तसेच आता अन्न आणि पुरवठा विभागाकडून दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबतमी माहिती स्वत छगन भुजबळ यांनी दिली आहे.