सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
खटाव -पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीचे गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांनी चोरी केलेले 14 मोबाईल हँडसेट व मोटरसायकल ही बुध गावचे नागरिकांचे वापरात असले बाबत पुसेगाव पोलीस यांना गोपनीय माहिती मिळाली होती. पुसेगाव पोलीसांनी विशेष पथक नेमून चोरीस गेलेले मोबाईल व मोटरसायकल वापर करणारे संशयितांची माहिती घेऊन संबंधित पंधरा संशयिताकडून एकूण 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
सदर वेळी हस्तगत करण्यात आलेली मोटरसायकल ही वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेली असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्याचबरोबर पुसेगाव पोलिस ठाण्याचे वतीने परिसरातील ज्या लोकांचे मोबाईल चोरी अथवा हरवलेले आहेत त्यांनी पुसेगाव पोलीस ठाणेशी संपर्क साधावा. गुन्ह्यातील पुढील तपास पोलीस हवालदार दीपक बर्गे हे करीत आहेत.
सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, कोरेगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांनी पुसेगाव पोलीस ठाणे कडील चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करणेबाबत वेळोवेळी सूचना देऊन मार्गदर्शन केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप शितोळे, सहाय्यक फौजदार सुधीर येवले, पोलीस हवलदार दीपक बर्गे, पोलीस नाईक सुनील अबदागिरी, पोलीस नाईक विजय खाडे, पोलीस नाईक सचिन जगताप, पोलीस कॉन्स्टेबल अशोक सरक, पोलीस कॉन्स्टेबल वैभव वसव, पुसेगाव पोलीस ठाणे यांनी सहभाग घेतला आहे.