जॅकलिन फर्नांडिसचा श्रीलंकेतून भारतात आणि त्यानंतर बॉलिवूडपर्यंतचा प्रवास कसा झाला हे जाणून घ्या

नवी दिल्ली । जॅकलिन फर्नांडिस ही बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. आपल्या सुंदर दिसण्यामुळे आणि विनोदी स्वभावामुळे तिने बॉलीवूडमध्ये अगदी कमी कालावधीत अनेकांची मने जिंकली आहेत. जॅकलीन मूळची श्रीलंकेची आहे. सध्या जॅकलीन चित्रपटांबरोबरच महाठग सुकेश चंद्रशेखर सोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. जॅकलीनचा श्रीलंका ते भारत असा प्रवास आणि त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये कसा प्रवेश केला हे जाणून घेउयात.

जॅकलिन फर्नांडिसचा जन्म 11 ऑगस्ट 1985 रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे झाला. तिचे प्राथमिक शिक्षण बहरीनमध्ये झाले आणि त्यानंतर ती मास कम्युनिकेशन कोर्ससाठी ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठात गेली.

जॅकलीनने लहानपणापासूनच हॉलिवूड स्टार बनण्याचे स्वप्न पाहिले होते, त्यामुळेच तिने जॉन स्कूल ऑफ एक्टिंग येथून ट्रेनिंगही घेतले होते. यानंतर तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. ज्यामध्ये ‘हाऊसफुल 2’, ‘रेस 2’, ‘किक’सह ‘जुडवा 2’, ‘हाऊसफुल 3’, ‘भूत पोलिस’ इ. चित्रपट आहेत. 2010 मध्ये तिला बेस्ट डेब्यू एक्ट्रेसचाअवार्डही मिळाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोर्स पूर्ण केल्यानंतर ती पुन्हा श्रीलंकेत आली आणि तिने रिपोर्टिंगसह मॉडेलिंगमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यानंतर 2006 मध्ये तिला मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा ताज मिळाला.

यशस्वी मॉडेल बनल्यानंतर, जॅकलिनला परदेशात प्रोजेक्ट मिळू लागले आणि 2009 मध्ये एका मॉडेलिंग असाइनमेंटसाठी ती भारतात आली. यादरम्यान तिने सुजॉय घोषच्या ‘अलादीन’साठी ऑडिशन दिले आणि तिची निवड झाली.

यानंतर तिला ‘मर्डर 2’ मध्ये भूमिका मिळाली, ज्याने तिला नाव आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवून दिले. चित्रपटांसोबतच जॅकलीन गाण्यांच्या अल्बममध्येही खूप गाजली. जॅकलिनने बादशाहसोबत GF-BF, ‘मेरे अंगने में 2.0’, ‘गेंदा फूल’ ‘पानी-पानी’ या अल्बमच्या गाण्यांमधून खूप प्रसिद्धी मिळवली आहे.

जॅकलिनचे नाव दिग्दर्शक साजिद खानसोबतही जोडले गेले होते. त्यांच्या नात्याच्या अनेक बातम्याही समोर आल्या होत्या. आजकाल जॅकलिन महाठग सुकेश चंद्रशेखर याच्यामुळे चर्चेत आहे.

ED ने तिहार तुरुंगातून 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कथित फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी अभिनेत्री लीना मारिया पॉल आणि इतर सहा जणांविरुद्ध 7,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात तपास यंत्रणेने म्हटले आहे की, सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला 10 कोटी रुपयांच्या गिफ्ट्स दिल्या आहेत, ज्यामध्ये 52 लाखांचा घोडा आणि 9 लाखांची पर्शियन मांजर असल्याचा उल्लेख आहे.

मात्र, जॅकलिनच्या प्रवक्त्याने अभिनेत्रीच्या वतीने एक निवेदन जारी करत सुकेश आणि त्याची पत्नी लीना मारिया पॉल यांच्याशी तिचा काहीही संबंध नसल्याचे म्हंटले आहे. सत्य काय आहे याचा तपास ED करत आहे.

You might also like