खो-खो स्पर्धेच्या निकालावरून शिक्षकासह केंद्रप्रमुखाला मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील बिटस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेअंतर्गत खोखो खेळादरम्यान निकालावरून झालेल्या वादात धामणगावामध्ये मास्तरासह केंद्रप्रमुखाला धारेवर धरीत मारहाण करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.याप्रकारानंतर बराच काळ परिसरात गावक-यांनी गर्दी केली. शेवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आता पोलीस सरंक्षणात खेळ खेळविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत भंगाराम तळोधी बिटामध्ये शालेय बिटस्तरीय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव कालपासून सुरू आहे. आज दुपारच्या सुमारास धामणगाव आणि सालेझरी या गावातील शाळेअंतर्गत खो खोचे सामने सुरू करण्यात आलेत. याच दरम्यान पंचांच्या निकालावरून चांगलाच वाद झाला. यावेळी सालेझरी येथील शिक्षक विपीन येनगंटीवार आणि भंगाराम तळोधी बिटाचे केंद्रप्रमुख सुनील मुत्यलवार यांना मारहाण करण्यात आली.

याप्रकाराची माहिती होताच संपूर्ण तालुक्यात याप्रकाराची चर्चा रंगू लागलीये. यानंतर बराच काळ वातावरण तणावपुर्ण होते. दरम्यान गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सर्व प्रकरण शांततेत हाताळून तोडगा काढला .मात्र त्या अन्यायग्रस्त शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी नेलं आहे.