खाऊगल्ली | अनेकजण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना नैवद्य म्हणून मोदकच आवडतात. त्यामुळे आपण आज जरा वेगळ्या पद्धतीचे मोदक करायला शिकणार आहोत.
साहित्य –
एक भांडं तांदळाची पिठी, १ वाटी खोवलेलं नारळ, १ वाटी चिरलेली कोथिंबीर,
१ लहान चमचा किसलेलं आलं, जिरेपूड, १/२ टे.स्पू. वाटलेली हिरवी मिरची, मीठ, लिंबू, हळद आणि चवीप्रमाणे साखर.
कृती –
1) १ भांडं पाण्यात थोडी हळद आणि थोडं मीठ घालून उकळायला ठेवावं. पाणी उकळल्यावर गॅस बंद करून तांदळाची पिठी घालावी.
2) मिश्रण चांगलं ढवळून झाकून ठेवावं. पाच मिनिटांनी ते पीठ परातीत काढून मळावे.
3) खोबरं, कोथिंबीर, आलं, मीठ, मिरची, लिंबू आणि साखर हे सर्व साहित्य एकत्र करून ठेवावं.
4) तांदळाच्या पिठाचे गोळे घेऊन त्याची पारी करून त्यात खोबर्याचं सारण भरून मोदक करावे.
5) मोदक मोदकपात्रात ठेवून 10 मिनिटं वाफवून घ्यावेत. पुदिन्याची चटणी आणि दह्याबरोबर या मोदकांचा नैवेद्य दाखवावा.