मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आजारी ; पोलार्ड म्हणतो….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये काल मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात रोमांचक सामना झाला . सुपर ओव्हर पर्यंत गेलेल्या या मॅच मध्ये पंजाबने मुंबईवर मात केली. एका सामन्यात दोन सुपर ओव्हर होण्याची आयपीएलच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. सामन्यानंतर होणाऱ्या प्रेजेंटेशनमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा तब्बेत खराब असल्यामुळे आला नाही. त्याच्याऐवजी आलेल्या कायरन पोलार्डने रोहित शर्माच्या प्रकृतीची माहिती दिली.

कायरान पोलार्ड म्हणाला की, “क्रिकेट मध्ये प्रत्येक धाव महत्वाची असते, हे या सामन्यानं दाखवून दिलं. टी २० क्रिकेटमध्ये एक किंवा दोन धावेला महत्व असतेच. पंजाबने आमच्यापेक्षा सरस खेळ केला त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये त्यांचा विजय झाला. राहुलने पुन्हा एकदा उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलं. ”

पोलार्ड म्हणाला की, ‘या सामन्यानंतर पुढील सामन्यासाठी आमच्याकडे चार दिवसांचा अवधी आहे. कर्णधार रोहित शर्मा अस्वस्थ आहे परंतु चिंता करण्याचं कारण नाही, कारण पुढील सामन्यापूर्वी रोहित शर्मा तंदुरुस्त होईल.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment