धक्कादायक ! दारूचा ग्लास सांडला म्हणून मित्राची निर्घृणपणे हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दारूचा ग्लास सांडला म्हणून काठ्या आणि दारूच्या बाटलीने मारहाण करून एकाची निर्घृणपणे हत्या (killed friend) करण्यात आली आहे. या मारहाणीत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव बालाजी असे आहे. या हत्येप्रकरणी (killed friend) निलेश धुमाळ आणि राजेंद्र थोरात या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

काय घडले नेमके ?
मृत बालाजी, निलेश धुमाळ आणि राजेंद्र थोरात हे तिघे कंट्री बारच्या मागील बाजूस दारू पिण्यासाठी बसले होते. निलेश आणि बालाजी दारू पिताना बालाजीकडून निलेश याचा दारूचा ग्लास सांडला म्हणून निलेशने काठ्या आणि दारूच्या बाटलीने मारहाण करून बालाजीची निर्घृणपणे हत्या (killed friend) केली.

शवविच्छेदनात डोक्याला मार लागल्याचे स्पष्ट
यानंतर या आरोपींनी बालाजीचा मृतदेह (killed friend) कचऱ्याच्या गाडीतून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टाकून दिला आणि घटनास्थवरून पळ काढला. मृत बालाजी हा नांदेडचा रहिवासी असून सध्या तो झाडू मारण्याचे काम करत होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये बालाजीच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केल्याचे समोर आले.

तपासासाठी दोन पथके
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून दोन पथके तयार करण्यात आली. परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. कचरा टाकणाऱ्या गाडीची ओळख पटवून याचा चालक राजेंद्र याला अटक केली. तर कंट्रीबार येथे काम करणारे अखिल आणि धर्मेंद्र या दोघांनी कचऱ्यासह बालाजीचा मृतदेह (killed friend) गाडीत भरला होता. त्यामुळे पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, उपनिरीक्षक बंडू मारणे आदींच्या पथकाकडून हि कारवाई करण्यात आली.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर