हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्याबद्दल जगभरात बरीच चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हुकूमशहा किम जोंग उनच्या तब्येतीबाबत रहस्य कायम आहे. परंतु या दरम्यान काही माध्यमांत किम जोंग उन चा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे तर काही अहवालांच्या नुसार तो जिवंत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उत्तर कोरिया कडून आतापर्यंत कोणतेही स्पष्ट विधान समोर आले नाही. यापार्श्वभूमीवर जगभरात किम जोंग ऊन च्या आयुष्याबाबत अनेक रहस्यमय गोष्टी सर्वत्र चर्चिल्या जात आहेत. आज आपण किम यांच्या आलिशान जीवनशैलीबाबत लीक झालेल्या मोठ्या ५ गोष्टींबाबत माहिती घेणार आहोत.
१) ९० डब्यांची स्पेशल बुलेटप्रूफ ट्रेन –
किम जोंग यांच्या यांच्याकडे स्पेशल ९० डबे असणारी बुलेटप्रूफ ट्रेन आहे. यामध्ये कॉन्फरन्स रूम, ऑडियन्स चेंबर, बेडरूम आणि सॅटलाईट फोन-टीव्ही कनेक्शन आहे. उत्तर कोरियातल्या एका रिपोर्टनुसार किम जोंग इल म्हणजेच किम जोंग यांच्या वडिलांचा मृत्यूही याच ट्रेनमध्ये झाला होता. या ट्रेनमध्ये जगातली सगळ्यात महाग वाईन मिळायची. तसंच ट्रेनमध्ये शानदार पार्टीही होत असे.
२) आलिशान विमान –
किम जोंग यांचं हे विमान पांढरं असून त्याच्या बाहेरच्या बाजूला कोरियन भाषेत मोठ्या अक्षरांमध्ये उत्तर कोरिया लिहिण्यात आलं आहे. तसंच या विमानावर उत्तर कोरियाचा झेंडाही आहे. विमानाच्या मागच्या भागावर निळ्या आणि लाल रंगाच्यामध्ये एक चांदणी आहे. किम जोंग यांच्या विमानाच्या आतमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. या विमानात किम जोंग काम करतात तसंच बैठकाही घेतात. विमानात किम जोंग यांचे काही फोटोही आहेत.
३) पोर्टेबल टॉयलेट –
सिंगापूरमध्ये अमेरिकेसोबत शिखर परिषदेसाठी आलेल्या किम जोंग यांची सोय जरी सेंट रेगीस या पंचतारांकीत हॉटेलमध्ये झाली होती, तरी त्यांनी स्वतः सोबत स्वतःचं पोर्टेबल टॉयलेट आणलं होतं. असंच टॉयलेट त्यांनी याआधी दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना भेटतानाही सोबत नेलं होतं. एवढंच नाही तर अगदी उत्तर कोरियातही फिरताना तो स्वतःचं टॉयलेट घेऊन फिरतात. स्वतःच्या विष्ठेतून आपल्या आयुष्यातली गुपीतं परदेशी गुप्तहेर शोधून काढतील, अशी भीती किम जोंगना वाटते.
४) बोट आणि पाणबुड्या –
उत्तर कोरियामध्ये किम जोंगला अनेकवेळा बोट, पाणबुडी, बस आणि स्की लिफ्टनं प्रवास करताना बघण्यात आलं आहे. मे २०१३ मध्ये जेव्हा सरकारी माध्यमांनी किम जोंग उनचा फिशिंग स्टेशनवरचा फोटो छापला होता, तेव्हा किम जोंगच्या मागे एक बोट दिसली होती.
५) किम जोंग-उनची मर्सिडीज बेंज –
चीन आणि सिंगापूर दौऱ्यावर असताना किम जोंग-उननी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी स्वत:च्या मर्सिडीज बेंज एस क्लास या गाडीचा वापर केला होता. ही गाडी खास किम जोंग यांच्यासाठीच तयार करण्यात आली आहे. २०१० साली ही गाडी बनवण्यात आली. या गाडीवर जवळपास १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले.