मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या अनेक सेलिब्रेटी कपल लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. तर असे अनेक सेलिब्रेटी कपल्स आहेत ज्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागलेली असते आणि ते लग्न कधी करतात याची ते वाट पाहत असतात. त्यातीलच एक कपल म्हणजे टेनिस स्टार लिएंडर पेस (leander paes) आणि बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा होय. हे दोघेही गेली अनेक दिवस एकमेकांना डेट करत आहेत. आता त्या दोघांच्या नात्याबाबत एक नवीन अपडेट समोर आली असून ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
किम शर्मा आणि लिएंडर पेस (leander paes) दोघेही लवकरच लग्न करून त्यांच्या नात्याची नवी सुरुवात करणार आहेत. या नवीन नात्यासाठी किम शर्मा आणि लिएंडर पेस (leander paes) यांना त्यांच्या पालकांचे आशीर्वाद मिळाले आहेत. या दोघांच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबीयांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच दोघेही लग्न करून पती-पत्नी बनण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे चाहत्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. हे लग्न इतर बॉलिवूड लग्नांसारखे शाही थाटामाटात होणार नाही. कारण किम आणि लिएंडर या दोघांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनेत्री किमचं हे दुसरं आणि लिएंडरचं तिसरं लग्न आहे. पहिलं लग्न यशस्वी न झाल्याने दोघांनीही आपापल्या जोडीदारासोबत घटस्फोट घेऊन वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. किम शर्माने 2010 मध्ये बिझनेसमन अली पुंजानीसोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या 6 वर्षानंतर म्हणजेच 2016 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्याचवेळी लिएंडर पेस अभिनेत्री महिमा चौधरीला डेट करत होते. हे नाते जास्त वेळ टिकू शकले नाही. यानंतर लिएंडर पेस यांनी संजय दत्तची माजी पत्नी रिया पिल्लईसोबत लिव्ह इनमध्ये राहिले होते. काही काळानंतर दोघांनी लग्न केले होते.त्यानंतर त्यांना एक मुलगीही झाली. मात्र हे नातेदेखील जास्त काळ टिकू शकले नाही. 2014 मध्ये लिएंडर पेस आणि रिया यांनी घटस्फोट घेतला आणि ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर आता किम शर्मा आणि लिएंडर पेस लवकरच संसार थाटून आपल्या नात्याची नवी सुरुवात करणार आहेत.
हे पण वाचा
वर्षातील पहिले चंद्रग्रहण लवकरच; तारीख, वेळ आणि सुतक कालावधी जाणून घ्या
15 दिवसांत पैसे डबल…; ‘या’ कंपनीच्या शेअर्सने केली कमाल
वेडात मराठे ‘वीर दौडले सात’! शिवरायांच्या पराक्रमी वीरांचा जाज्वल्य इतिहास रुपेरी पडद्यावर झळकणार
Google Recruitment 2022 : IT फ्रेशर्ससाठी भारतात मोठी संधी
हवा भरताना JCB चा टायर फुटला, दोघांचा मृत्यू